News Flash

इस्राईली दूतावासाबाहेरील स्फोटाप्रकरणी चार विद्यार्थ्यांना अटक

इस्राईली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने लडाखमधील ४ विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

इस्राईल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाप्रकरणी चार विद्यार्थ्यांना अटक (फोटो- Indian Express File Photo)

इस्राईली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने लडाखमधील ४ विद्यार्थ्यांना अटक केली आहे. २९ जानेवारी २०२१ रोजी संध्याकाळच्या सुमारास हा स्फोट झाला होता. त्यानंतर तपास यंत्रणा आरोपींचा शोध घेण्यासाठी कार्यरत झाल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आपल्या तपासाची चक्र वेगाने फिरवत कारगिलमधून चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी दिल्लीत आणलं. चौकशी दरम्यान स्फोटाचा कट रचण्यात सहभागी असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात पोलिसांनी सीसीटीव्हीत चित्रित झालेल्या दोन व्यक्तींचा पत्ता सांगणाऱ्यांना १० लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. या दोन व्यक्तींनी इस्राईली दूतावासाबाहेर स्फोटकं ठेवल्याचं तपासात उघड झालं होतं. त्यानंतर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती जॅकेट घालून फुटपाथवरून जात असल्याचं दिसले होते. त्यांच्यावर संशय आल्याने दिल्ली पोलिसाठी २०० सीसीटीव्हींचं फुटेज पाहिले. या सीसीटीव्हीत ते दोघंही चेहरा झाकून जात असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तपासाची सूत्र त्यांच्या दिशेने वळवली आणि त्यांना ताब्यात घेतलं.

यावर्षी नवी मुंबईत सुरू होणार JIO INSTITUTE; नीता अंबानी यांची घोषणा!

दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवर २९ जानेवारीला संध्याकाळी पाचच्या सुमारास स्फोट झाला होता. या स्फोटात काही गाड्यांचं नुकसान झालं होतं. घटनास्थळावर पोलिसांना एक पत्रही मिळालं होतं. त्यात हा फक्त ट्रेलर असल्याची धमकी देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 10:16 pm

Web Title: special team of delhi police arrested 4 students connection with the blast outside the israeli embassy rmt 84
टॅग : Crime News
Next Stories
1 “जम्मू-काश्मीरमधील लोकशाही प्रक्रियेसाठी बांधील”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्वपक्षीय नेत्यांना आश्वासन!
2 राज्याच्या दर्जासह काश्मिरी नेत्यांनी पंतप्रधानांकडे केल्या ‘या’ ५ प्रमुख मागण्या!
3 करोनाचा महिला आणि तरुण नोकरदारांना सर्वाधिक फटका! ‘लिंक्डइन’च्या सर्वेक्षणातील चिंताजनक माहिती
Just Now!
X