राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची (एनएफएसए) अंमलबजावणी करण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांनी कोणतेही योगदान दिले नाही, मात्र त्याबाबत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत केला.

या कायद्यान्वये सरकार गरिबांना सवलतीच्या दराने गहू आणि तांदळाचा पुरवठा करते, मात्र उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांनी त्यामध्ये आपले योगदान दिले नाही, असे पासवान यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.