News Flash

लसींची निर्यात थांबवा; राहुल गांधींचं मोदींना पत्र

केंद्र सरकारने पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करावी, असं देखील म्हणाले आहेत.

संग्रहीत

देशात एकीकडे दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढत असून, दुसरीकडे सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आता काहीसे अडथळे निर्माण होताना दिसत आहे. कारण, पुरेसा लसींचा साठ नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण मोहिमेलाच ब्रेक लागल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, “आवश्यकता असलेल्या प्रत्येकाला लसीकरण झाले पाहिजे आणि तत्काळ लसींच्या निर्यातीवर बंदी आणली गेली पाहिजे. लसी जलगतीने उपलब्ध व्हायला हव्यात.” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

प्रकाश जावडेकर म्हणतात, “लस पुरवठा पुरेसा, पण महाराष्ट्र सरकारच काम नीट करत नाही!”

तसेच, “वाढत्या करोना संकटात लसींची कमतरता एक अतिगंभीर समस्या आहे, ‘उत्सव’ नाही. आपल्या देशवासियांना संकटात टाकून लसींची निर्यात योग्य आहे का? केंद्र सरकारने पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना  मदत करावी. आपल्या सर्वांना मिळून या महामारीला हरवायचं आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

“देश या क्षणाली महामारीच्या दुसऱ्या लाटेशी झगडत आहे. आपल्या शास्त्रज्ञ व डॉक्टरांनी मिळून करोना नष्ट करण्यासाठी लस बनवली. मात्र सरकारने लसीकरण कार्यक्रमाची योग्यप्रकारे अंमलबजावणी केली नाही. देशात एवढ्या हळूवारपणे लसीकरण सुरू आहे की, ७५ टक्के लोकांना लस देण्यासाठी वर्षांचा कालावधी लागेल.” असं देखील राहुल गांधींनी बोलून दाखवलं आहे.

“केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आरशासमोर उभं करुन विचारा की, केंद्राने खरंच महाराष्ट्राला…”

याशिवाय राहुल गांधींनी देशात करोाबाधितांच्या संख्येतील विक्रमी वाढ आणि केंद्र सरकार व काही राज्यांमध्ये लसींचा पुरवठ्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देखील पत्रात लिहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 1:45 pm

Web Title: stop export of vaccines rahul gandhis letter to modi msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “त्याला करोना झालाय, मला नाही,” रुग्णाला घेऊन जाणारा कर्मचारी ज्यूस सेंटरवर थाबंल्याने नागरिक अवाक
2 देशात आत्तापर्यंत नेमकं किती लसीकरण झालंय? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली सविस्तर आकडेवारी!
3 “केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आरशासमोर उभं करुन विचारा की, केंद्राने खरंच महाराष्ट्राला…”
Just Now!
X