26 February 2021

News Flash

आयआयटीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नैराश आल्याने आत्महत्या केल्याचा अंदाज

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

२१ वर्षांच्या आयआयटीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. खोलीत असलेल्या पंख्याला दोरी बांधून या विद्यार्थ्याने गळफास घेतला. अभिजित सिंग बन्सिया असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. देहरादूनच्या आयआयटी रुरकी येथील ही घटना आहे. त्याच्या खोली पोलिसांना सुसाइट नोट आढळलेली नाही. या विद्यार्थ्याने नैराश्य आल्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

अभिजित सिंग हा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत फारसा बोलत नसे, फारसा मिसळत नसे अशी माहिती त्याच्या महाविद्यालायातील मुलांनी पोलिसांना दिली. साधना त्यागी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ही माहिती दिली. आयआयटी रुरकी मध्ये दरवर्षी अशा एक किंवा दोन घटना उघडकीस येतात असेही त्यागी यांनी म्हटले आहे. या विद्यार्थ्याचे कुटुंबीय आयआयटीमध्ये पोहचले आहे. या कुटुंबाकडे अभिजितचे पार्थिव सोपवले जाणार आहे. अभिजित बन्सिया हा विद्यार्थी मूळचा गुजरात येथील राहणारा होता असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 3:58 am

Web Title: student commits suicide at iit roorkee
Next Stories
1 फ्लोरिडातला पादचारी पूल कोसळला, ४ ठार तर ९ जखमी
2 जीएसटी सर्वात किचकट आणि महाग
3 वर्णभेदी भूमिका पोसल्याची ‘नॅशनल जिऑग्राफिक’ची कबुली
Just Now!
X