नवी दिल्ली : ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या नौदलासाठीच्या आवृत्तीची चाचणी बंगालच्या उपसागरात मंगळवारी यशस्वी झाली आहे. लष्कराच्या तीनही सेनादलांसाठी या क्षेपणास्त्राच्या चाचण्या सुरू आहेत. सहा आठवडय़ांपूर्वी अशीच चाचणी नौदलासाठी अरबी समुद्रात घेण्यात आली होती. ब्राह्मोस एरोस्पेस या भारत-रशिया यांच्या संयुक्त प्रकल्पात हे स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.  २४ नोव्हेंबरला त्याची जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी चाचणी २.८ मॅक वेगाने  (ध्वनीच्या तीन पट वेगाने) यशस्वी झाली होती.