News Flash

Corona Crisis : ऑक्सिजन पुरवठ्याच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं!

दिल्लीत आज खरोखर ऑक्सिजन उपलब्ध नाही, गुजरात, महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती असल्याचंही सांगितलं आहे.

(संग्रहित छायाचित्र)

देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज(शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयात ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा व इतर धोरणां संबंधीच्या मुद्यांवर सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी ऑक्सिजन पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत एक अशी व्यवस्था बनवली जावी, ज्याद्वारे लोकांना कळाले पाहिजे की ऑक्सिजनचा किती प्रमाणात पुरवठा केला गेला आहे आणि कोणत्या रूग्णालयात किती ऑक्सिजन उपलब्ध आहे.

Supreme Court begins hearing in the case where it took suo moto cognizance on issues related to oxygen supply, drug supply, and various other policies in relation to the #COVID19 pandemic. pic.twitter.com/WfgBAXCEXV

तसेच, न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, ”आम्ही हे देखील ऐकत आहोत की, नागरीक ऑक्सिजन सिलिंडरसाठी रडत आहेत. दिल्लीत खरोखर ऑक्सिजन उपलब्ध नाही, गुजरात, महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. सरकारला आम्हाला हे सांगाव लागेल की आज आणि सुनावणीनंतरच्या दिवसापासून परिस्थीतीत काय फरक पडेल.”

आणखी वाचा- लसींचा १०० टक्के साठा केंद्र सरकारच का विकत घेत नाही?; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

याशिवाय न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, आमच्या समक्ष काही अशा देखील याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, ज्या गंभीर स्वरूपात स्थानिक मुद्दे समोर आणत आहेत. अशा मुद्दे उच्च न्यायालयात उचलले गेले पाहिजेत.

आणखी वाचा- खबरदार! सोशल मीडियावरून मदत मागणाऱ्यांवर कारवाई कराल तर; सर्वोच्च न्यायालय संतापले

याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने यावेळी महत्वपूर्ण आदेश देत म्हटले की, ”सोशल मीडियावर ऑक्सिजन, बेड, औषधी इत्यादींच्या तुटवड्याबाबत पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई होणार नाही. कोणतेही सरकार एखाद्या नागरिकाकडून सोशल मीडियावर अशा संदर्भात टाकण्यात आलेल्या माहितीबाबत कारवाई करणार नाही. एवढच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने राज्यं व डीजीपी यांना आदेश देत म्हटले की, जर अफवा पसरवल्याच्या नावाखाली कारवाई केली गेली तर अवमानना खटला चालवला जाईल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 1:23 pm

Web Title: supreme court begins hearing in the case where it took suo moto cognizance on issues related to oxygen supply msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 काहीतरी करा… देशातील नामांकित संस्थांमधील १०० संशोधकांचे मोदींना पत्र
2 “राजकीय नेते कर्तव्य पार पाडण्यात कमी पडले,” मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाची याचिका
3 करोना लसीकरण : पहिल्या ५३ तासांमध्ये २ कोटी २८ लाख ९९ हजार १५७ जणांनी CoWIN वरुन केली नोंदणी
Just Now!
X