लैंगिक शोषण प्रकरणात अडकलेल्या तरुण तेजपालच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने तरुण तेजपालची याचिका फेटाळली आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका तरुण तेजपालने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 2013 मधलं हे लैंगिक शोषणाचं प्रकरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे.

 

काय आहे प्रकरण?
महिला सहकाऱ्याचे लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याप्रकरणी तहलकाचा संस्थापक आणि संपादक याला अटक करण्यात आली. तसंच 2014 मध्ये गोवा पोलिसांनी त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. बलात्कार, लैंगिक शोषणाचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी तरुण तेजपालविरोधात 684 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

2013 मधल्या गोवा फिल्म फेस्टिव्हलच्या दरम्यान हे सगळे प्रकरण उघडकीस आले आहे. तरुण तेजपालवर 80 दिवसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आले. आता याप्रकरणी तरुण तेजपालला आणखी एक झटका बसला आहे. त्याने निर्णयाला आव्हान देणारी जी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.