24 September 2020

News Flash

ईडीच्या चौकशीपूर्वी रियाने वकिलांद्वारे केली ‘ही’ मागणी

सुशांतच्या खात्यामधील १५ कोटी रुपये काढल्याप्रकरणी होणार रियाची चौकशी

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ईडीने सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला नोटीस बजावली होती. त्यानुसार आज (७ ऑगस्ट) रियाची चौकशी होणार आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियानं केल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये अशी विनंती रियाने केल्याचं तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी सांगितलं आहे. सुशांतच्या खात्यामधून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप रियावर करण्यात आला आहे. त्यामुळे याच प्रकरणी रियाची आज चौकशी होणार आहे.


दरम्यान, सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी रियाने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेली असं म्हटलं. तसंच सुशांतच्या खात्यामधील १५ कोटी रुपये देखील रियाने काढले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ईडीने रिया विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यामुळे चौकशीसाठी आज रियाला ईडीसमोर हजर राहावं लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 10:08 am

Web Title: sushant case patna sp ed summoned actor business manager rhea chakraborty ssj 93
Next Stories
1 करोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पार पण…; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
2 भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकची गळफास घेऊन आत्महत्या
3 चीनला मोठा झटका; टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी
Just Now!
X