News Flash

जयंती विशेष : काही काळासाठी स्वामी विवेकानंदही झाले होते बेरोजगार

देशभरात स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिवस म्हणून साजरी केली जाते

स्वामी विवेकानंद यांची जयंती १२ जानेवारीला असते हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचे अनुयायी जगभरात आहेत. तत्त्वज्ञान या विषयावर त्यांची असलेली पकड अभूतपूर्व होती. युवकांना आजही स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रेरित करत असतात. शिकागो येथील एका परिषदेत त्यांनी केलेलं भाषण चांगलंच गाजलं होतं. स्वामी रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते.

स्वामी विवेकानंदांवरही बेरोजगार होण्याची वेळ आली होती. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे १८८४ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. कारण याच काळात ते बेरोजगार होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ होते तर आईचे नाव भुवनेश्वरी होते. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र होते. त्यांनी कोलकाता येथील महाविद्यालयातून बी. ए. आणि लॉ ची डिग्री घेतली होती. तरीही त्यांच्या आयुष्यातल्या काही काळ असा होता ज्या कालावधीत ते बेरोजगार होते.

स्वामी विवेकानंद यांची जयंती पश्चिम बंगालच्या अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये साजरी केली जाते. एवढंच नाही तर  रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या ठिकाणीही विवेकानंदांची जयंती उत्साहात साजरी होते. फक्त पश्चिम बंगालच नाही तर देशभरात स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी होते. याशिवाय कॅनडा, टोरंटो या देशांमध्येही त्यांची जयंती साजरी केली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 7:40 am

Web Title: swami vivekananda birthday special story scj 81
Next Stories
1 जयंती विशेष : असे आहे स्वामी विवेकानंदांचे कन्याकुमारीतील स्मारक
2 मुलांचे पोट भरण्यासाठी आईने १५० रुपयांना विकले स्वत:चे केस
3 एलियन्स आहेत का? “होय! कदाचित पृथ्वीवरच आहेत; फक्त…”
Just Now!
X