News Flash

जयंती विशेष: स्वामी विवेकानंदांची ही वाक्यं देतील संघर्षात लढण्याची प्रेरणा

संघर्षात लढण्याची प्रेरणा हवी असेल तर जरुर वाचा ही वाक्यं

संग्रहित छायाचित्र

स्वामी विवेकानंद यांच्या वाणीची भुरळ आजही जगभरातल्या युवकांना पडली आहे. स्वामी विवेकानंद यांचं व्यक्तीमत्त्वच तसं होतं. १२ जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती. त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते. आजही त्यांची वाक्य किती प्रेरणादायी आहेत याचा प्रत्यय ती वाक्यं वाचल्यावर येतो. अनेकदा युवा वर्ग हा विविध पातळ्यांवर संघर्ष करत असतो. संघर्ष करणाऱ्यांनी स्वामी विवेकानंदांची वाक्य वाचली तर लढण्याची प्रेरणा मिळते.

स्वामी विवेकानंद यांची प्रेरणादायी वाक्यं

  • एकाग्रतेने वाचन करा, एकाग्रतेसाठी आवश्यक आहे ती ध्यानधारणा, ध्यानधारणा केल्याने आपण इंद्रियांवर संयम ठेवू शकतो
  • ज्ञान हा वर्तमान काळ आहे, मनुष्य त्याचा अविष्कार करतो ही बाब विसरु नका
  • उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमची लक्ष्यप्राप्ती होत नाही
  • जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत शिकणं बंद करु नका, अनुभव हा आपला गुरु आहे ही बाब विसरु नका
  • लोक तुमची स्तुती करोत किंवा निंदा, लक्ष्य तुम्ही गाठण्याची तुमची वाट बिकट असो किंवा सुकर तुम्ही तुमचा योग्य मार्ग सोडू नका
  • ज्या क्षणी एखादं काम करण्याची घोषणा कराल त्याच क्षणी ते काम सुरु करा नाहीतर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल
  • जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही
  • एकावेळी एकच काम हाती घ्या आणि ते तडीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, ते काम पूर्ण होईपर्यंत सगळ्या गोष्टी काही क्षणांसाठी विसरुन जा
  • तुमचा संघर्ष जेवढा मोठा असेल तेवढेच मोठे यश तुम्हाला मिळेल हे लक्षात ठेवा
  • ज्यादिवशी तुमच्यासमोर कोणतीही समस्या नसेल त्यादिवशी ही बाब निश्चित झाली असेल की तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात

स्वामी विवेकानंद यांची वाक्यं आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात. या वाक्यांमधून प्रेरणा मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 8:00 am

Web Title: swami vivekanandas special thoughts which inspire any one scj 81
Next Stories
1 जयंती विशेष: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा ध्यानधारणा! विवेकानंदांचा संदेश
2 जयंती विशेष : काही काळासाठी स्वामी विवेकानंदही झाले होते बेरोजगार
3 जयंती विशेष : असे आहे स्वामी विवेकानंदांचे कन्याकुमारीतील स्मारक
Just Now!
X