29 October 2020

News Flash

…चर्चा फक्त पंतप्रधान मोदींच्या कडेवरील मुलाची

पंतप्रधान मोदींचे लहान मुलांवर असलेले प्रेम लपून राहिलेले नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लहान मुलांवर असलेले प्रेम आता काही लपून राहिलेले नाही. जेव्हा केव्हा असा एखादा प्रसंग येतो तेव्हा पंतप्रधान मोदी अगदी मनमोकळ्यापणाने मुलांवर प्रेम करतांना दिसले आहेत. अशाचप्रकारे आज देखील पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर त्यांना भेटायला आलेल्या एका खास छोट्या दोस्ताचा फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली मोदींनी म्हटले देखील आहे की, अतिशय खास दोस्त मला भेटायला आज संसदेत आला आहे. या फोटोत मोदी या खास दोस्ताशी काही क्षण खेळतांना देखील दिसत आहेत.

मंगळवारी पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी संसदेत मध्य प्रदेशचे खासदार सत्यनारायण जटिया आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा, सुन व नातू देखील होते. यावेळी मोदींनी त्यांच्या नातवाला आपल्याजवळ घेतले होते. या भेटीनंतर मोदींनी त्याच्या बरोबर खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A very special friend came to meet me in Parliament today.

A post shared by Narendra Modi (@narendramodi) on

मोदींच्या या टि्वटवर युजर्सनी नोंदवलेल्या काही  प्रतिक्रिया –

 

Beta Trump se Kashmir issue solve nahi ho pana hai. pic.twitter.com/zNKlYA7fDU

— peeyush (@bhadmeinjao09) July 23, 2019

 

इन्स्टाग्रामवरील देखील अनेकांना फोटो आवडला आहे. अनेकांनी तो लाईक केला असून, त्यावर प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 5:15 pm

Web Title: talk only about pm modis best littile friend msr 87
Next Stories
1 बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान
2 उत्तराखंड सरकारचा आळशी सरकारी कर्मचाऱ्यांचा दणका, देणार सक्तीची निवृत्ती
3 भारत-पाकिस्तानमध्ये चर्चेने काश्मीर प्रश्न सुटणार नाही – इम्रान खान
Just Now!
X