07 March 2021

News Flash

मृत समजून मोठ्या भावाला ठेवलं फ्रीझरमध्ये, पण दुसऱ्या दिवशी घडलं भलतंच…

कुटुंबियांवर गुन्हा दाखल

प्रतीकात्मक छायाचित्र

तामिळनाडूमध्ये घडलेली एक आश्चर्यकारक घटना नुकतीच समोर आली आहे. यामध्ये एका ७४ वर्षीय वृद्ध व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांनी मृत समजून रात्रभर फ्रिझर बॉक्समध्ये ठेवलं. मात्र, ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी जिवंत असल्याचं समोर आलं. दरम्यान, पोलिसांनी या व्यक्तीची सुटका करुन त्याच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बालासुब्रमनिया कुमार (वय ७४, रा. कंधामपत्ती, जि. सालेम) असं फ्रिजरमध्ये ठेवलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. बालासुब्रमनिया हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असून रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते आपला ७० वर्षीय लहान भाऊ सर्वानन आणि बहिण गीता यांच्यासोबत राहत आहेत.

सर्वानन यांच्या माहितीनुसार, “त्यांना वाटलं की त्यांचा भाऊ बालासुब्रमनिया यांचे निधन झाले आहे. त्यामुळे आम्ही मृतदेह ठेवण्यासठी फ्रिजर बॉक्स मागवून घेतला. अंत्यसंस्कारासाठी मंगळवारी दुपारी आमचे नातेवाईकही घरी आले.” इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलं आहे. मात्र, एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात, बालासुब्रमनिया कुमार यांच्या नातेवाईकांनी ते आजारातून बरे झालेले नसताना रुग्णालयातून डिस्चार्ज घेत घरी नेले त्यानंतर त्यांचा मृत्यू व्हावा यासाठी त्यांना फ्रिजरमध्ये ठेवल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, फ्रिजर कंपनीचा कर्मचारी फ्रिजर बॉक्स घेऊन जाण्यासाठी सर्वानन यांच्या घरी पोहोचला तर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. फ्रिजर बॉक्समध्ये ठेवलेल्या व्यक्तीचा श्वास सुरु असल्याचे त्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलिसांनी याची खबर दिली त्यानंतर पोलिसांनी बालासुब्रमनिया यांना वाचवलं.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी बालासुब्रमनिया यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला असून भादंविच्या कलम २८७ नुसार व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्यासाठी निष्काळजीपणा केल्याच्या कारणाने तसेच कलम ३३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 10:49 am

Web Title: tamil nadu dead man kept in freezer box by kin rescued alive by cops day later aau 85
Next Stories
1 दोन वेळच्या अन्नाची भ्रांत, गरिबीला कंटाळून आईनेच घेतला सहा वर्षाच्या चिमुरडीचा जीव
2 देशात चोवीस तासांत ६८० करोनाबाधितांचा मृत्यू, नव्या ६७,७०८ रुग्णांची नोंद
3 ‘पीएम केअर्स’ निधीला कर्मचाऱ्यांच्या पगारातून मिळाले १५७ कोटी; रेल्वेने दिली सर्वाधिक रक्कम
Just Now!
X