News Flash

महिंद्रा आणणार ‘करोना’वर औषध; पेटंट मिळण्याची प्रतीक्षा

3D फुफ्फुसावर औषधाची चाचणी परिणामकारक

करोनामुळे त्रस्त असलेल्या सगळ्यांना  दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आयटी क्षेत्रातील आघाडीची टेक महिंद्रा आणि रीगेन बायो सायन्स यांनी एकत्र येत करोनावरील औषध शोधून काढले आहे. मार्कर्स लॅब टेकने रीगेन बायो सायन्ससोबत करोना व्हायरसवर गुणकारी ठरणाऱ्या करणाऱ्या एका रेणूचा म्हणजेच औषधाचा शोध लावला आहे. मार्कर्स लॅब टेक ही महिंद्राची संशोधन करणारी कंपनी आहे. टेक महिन्द्राचे जागतिक प्रमुख असणाऱ्या निखिल मल्होत्रा यांनी या मॉलिक्यूलच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. त्यानंतर याची चाचणी करण्यात येणार आहे.

टेक महिंद्रा आणि रेजीन बायो सायन्स यावर संशोधन करत आहेत. मार्कर्स लॅबने करोना विषाणूचे संगणकीय विश्लेषण सुरू केले आहे. त्या आधारे, टेक महिंद्रा आणि रेजीन बायो सायन्स यांनी एफडीएने मान्यता दिलेल्या ८००० औषधांपैकी १० औषधांच्या मॉलिक्यूलच्या निवड केली आहे. १० औषधांच्या मॉलिक्यूलपैकी ३ औषधांची निवड केली आहे. त्यानंतर एका थ्रीडी फुफ्फुसावर या औषधांची चाचणी करण्यात आली. तीनपैकी एक औषध परिणामकारक असल्याचे मार्कर्स लॅबने सांगितले आहे. त्या औषधावर टेक महिंद्राने संगणकीय आणि रेजीन बायो सायन्सने वैद्यकीय विश्लेषण केले आहे. मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी वेळेत औषधे शोधता येतील.

या औषधाची प्राण्यांवर चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर अभ्यास करण्याची देखील आवश्यकता असणार आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की, या तंत्रामुळे औषधांच्या शोधासाठी कमी वेळ लागेल. आम्ही त्याची कार्यक्षमता तपासण्यासाठी अधिक अभ्यास करीत आहोत. जगभरात बऱ्याच औषधांवर चाचण्या सुरू आहेत. लोक प्राणघातक अशा करोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी फक्त लसीवर अवलंबून आहेत असे मल्होत्रा यांनी सांगितले.

सोमवारी २ कोटींच्या पुढे जाणार देशातील करोना रुग्णांची संख्या

भारतातील करोना रूग्णांची संख्या १ कोटी ९९ लाख १९ हजार ७१५ वर पोहोचली आहे. २० दशलक्षाहून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग होणारा भारत हा जगात दुसरा देश असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 7:09 pm

Web Title: tech mahindra coronavirus new medicine patent filing abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 या महिन्यातल्या सगळ्या ऑफलाईन परीक्षा पुढे ढकला- शिक्षण मंत्रालयाचा आदेश
2 Corona Vaccine: सत्य तर जाणून घ्या, पुनावालांचं आवाहन
3 ठरलं! ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
Just Now!
X