06 March 2021

News Flash

दूरध्वनी विभागाच्या लाइनमनला दहशतवादी समजल्याने गोंधळ

सीसीटीव्ही चित्रीकरण बघितले असता ते दूरध्वनी विभागाचे लाईनमन असल्याचे समजले.

| January 13, 2016 12:49 am

येथील सीमावर्ती भागात दूरध्वनी विभागाचे दोन लाइनमन दुरुस्तीसाठी आले असता ते दहशतवादीच आहेत असे समजून सुरक्षा दलांनी कॅन्टोन्मेंट भागाला वेढा घातला. हे दोनजण दिसल्यानंतर लष्कराला माहिती देण्यात आली व जलद प्रतिसाद दल सक्रिय करण्यात आले व तपासणी सुरू झाली. हे लाईनमन भिंतीवर चढून दूरध्वनी लाइनची दुरूस्ती करीत होते.

सीसीटीव्ही चित्रीकरण बघितले असता ते दूरध्वनी विभागाचे लाईनमन असल्याचे समजले. पठाणकोट हल्ल्याच्या कटुस्मृती ताज्या असतानाच ही घटना घडल्याने आई-वडील मुलांना घरी नेण्यासाठी शाळेत आले होते. फिरोजपूरचे ज्येष्ठ पोलीस अधीक्षक हरदयाल सिंग यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी घुसखोरी केली व त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला या अफवा आहेत त्यामुळे घाबरून जाऊ नये. २ जानेवारीला पहाटे पठाणकोट हवाई तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्यात सहा अतिरेकी मारले गेले, तर सात सुरक्षा जवान हुतात्मा झाले होते. हे दहशतवादी पंजाबनजीक सीमा ओलांडून आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 12:49 am

Web Title: telephone department lineman understands as terrorist due to that confusion created
टॅग : Terrorist
Next Stories
1 प्रेम प्रकरणातून मुलीने प्रियकरावर अ‍ॅसिड फेकले
2 माजी अध्यक्षांवर टीका; गोवा विधानसभेत गोंधळ
3 टेलिफोन दुरूस्तीसाठी भिंतीवर चढलेले दोघेजण दहशतवादी असल्याच्या संशयाने लष्करी छावणीत गोंधळ
Just Now!
X