पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील २० कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीवर अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस यांनी ट्विट केले आहे. ‘मोदींसोबत उत्कृष्ट बैठक झाली. भारतातील संशोधन आणि आशावादाने मी नेहमीच प्रभावित होतो’ असे बेझॉस यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेरिकेतील २० कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. भारतात उद्योग व्यवसायांना पोषक वातावरण निर्माण केल्याचे मोदींनी या बैठकीत सांगितले. या बैठकीवर अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली. भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्साहित असल्याचे त्यांनी सांगितले. अॅमेझॉन भारतात ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

dombivali, 17 year old bangladeshi girl,
आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीनं केलं बाळाचं अपहरण..
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
jaya bachchan opens up on relationship with amitabh bachchan
जया बच्चन यांनी बिग बी यांच्याबरोबरच्या नात्याबाबत केला खुलासा, नातीच्या शोमध्ये म्हणाल्या, “माझे पती…”
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका

मोदींनी २० कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये बेझॉस यांच्यासह मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, अॅपलचे टिम कुक, मास्टर कार्डचे अजय बंगा यांच्यासह वॉलमार्ट, अॅडोब, जॉन्सन अँड जॉन्सन आदी कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांचा समावेश होता. पूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले असून भारताची सातत्याने प्रगती होत आहे. भारतात उद्योग व्यवसायांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने सात हजारांवर सुधारणा घडवून आणल्याचा दावा मोदींनी या बैठकीत केला होता. दरम्यान, ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडी कंपनी असलेल्या अॅमेझॉनला सध्या भारतीय कंपनी फ्लिपकार्टकडून चांगली टक्कर मिळत आहे. त्यामुळे अॅमेझॉनने भारतावर अधिक लक्षकेंद्रीत करण्याचे ठरवले आहे.

अॅपलचे सीईओ टिम कुक यांनीदेखील नोटाबंदीच्या निर्णयावरुन मोदींचे कौतुक केले. नोटाबंदीसारखा निर्णय अद्याप कोणीही घेतलेला नव्हता असे कुक यांनी मोदींना सांगितले. मोदींसोबतच्या भेटीत टिम कुक यांनी भारतातील आयफोनच्या उत्पादन प्रकल्पांविषयी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.