09 March 2021

News Flash

दहशतवादाला थांबवण्याची गरज, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचे आवाहन

देशातील जनतेने दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची गरज

थेरेसा मे (संग्रहित छायाचित्र)

आपल्या देशातील जनतेने एकत्र येऊन कट्टरतावाद आणि दहशतवादाला आता थांबवण्याची गरज असल्याचे आवाहन ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी केले आहे. आपल्या देशातील लोकांमध्ये खूप सहनशीलता आहे. अनेक देशांना नव्या दहशतवादी प्रवृतीचा सामना करावा लागत आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

लंडनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशातील जनतेला दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले.

लंडनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. या बॉम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वीही लंडन येथे संसदेजवळ दहशतवादी हल्ला झाला होता. ती घटना ताजी असतानाच काल हा प्रकार घडल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

इंग्लंडमध्ये सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे. रविवारी एजबस्टन क्रिकेट मैदानावर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना सुरू होण्यापूर्वी बॉम्बस्फोटात मृत पावलेल्यांना आदरांजली वाहण्यात आली.

दरम्यान, संसदीय निवडणूक येत्या ८ जूनला होत आहे. ही निवडणूक पुढे ढकलण्यात येणार नसल्याची माहिती महापौर सादिक खान यांनी रविवारी दिली. ते म्हणाले, ही निवडणूक पुढे ढकलायला मी काय वकील नाही. दहशतवाद्यांना निवडणूक नको आहे, त्यांना लोकशाही आवडत नाही. दहशतवाद्यांना जरी लोकशाही आवडत नसली, तरीदेखील तुम्ही सर्वांनी मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.

वर्षांतील तिसरा हल्ला

लंडन : यंदाच्या वर्षी ब्रिटनमधील हा तिसरा दहशतवादी हल्ला होता. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास लंडन पूल व बरो मार्केट येथे हे दोन दहशतवादी हल्ले झाले असून त्यामुळे मतदानाच्या वेळी असे हल्ले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २२ मे रोजी मँचेस्टर एरिना भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २२ जण ठार तर ११६ जण जखमी झाले होते. त्यातील हल्लेखोर  सलमान अबेदी  याने देशी बॉम्बचा आत्मघाती स्फोट केला होता.अमेरिकी गायिका एरियाना ग्रांदे हिच्या पॉप मफलीनंतर लोक निघाले असताना हा हल्ल करण्यात आला होता. २२ मार्च रोजी पार्लमेंट हाऊस येथे हल्ल्यात सहा ठार झाले होते, त्यात एका हल्लेखोराचा समावेश होता, तर दीडशे जण जखमी झाले होते. हल्लेखोर खालिद मसूद याने त्याची मोटार वेस्टमिन्स्टर पुलाच्या पदपथावर घातली होती, नंतर ती कुंपणावर जाऊन धडकली.

ट्रम्प यांच्याकडून निषेध

वॉशिंग्टन : लंडन येथील हल्ल्यानंतर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना दूरध्वनी करून सहवेदना व्यक्त केली.  लंडन पूल व बरो मार्केट येथे झालेल्या हल्ल्यांच्या तपासात पूर्णपणे मदत करण्याची तयारी ट्रम्प यांनी दर्शवली असून त्यांनी या घटनेत पोलिस व इतरांनी या हल्ल्यांना दिलेल्या खंबीर प्रतिसादाची प्रशंसा केली आहे.

दहशतवादाविरुद्ध संयुक्त प्रयत्न हवेत – पुतिन

मॉस्को : लंडन हल्ल्यामागील ‘क्रूरता आणि नीचपणा’ यांचा निषेध करतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आणखी मोठय़ा प्रमाणात संयुक्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. ब्रिटिश लोकांबाबत पुतिन यांनी गंभीर शोकसंवेदना व्यक्त केल्या असून लंडनमध्ये काही तासांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आह.

 हॅले यांच्याकडून ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन

वॉशिंग्टन : हवामान बदलाविषयीच्या ऐतिहासिक पॅरिस करारातून बाहेर पडण्याच्या अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त निर्णयाचे संयुक्त राष्ट्रातील अमेरिकी राजदूत निकी हॅले यांनी समर्थन केले आहे, मात्र तापमानवाढीला आळा घालण्यास अमेरिका बांधील असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे नुकसान होणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

 हल्ले धक्कादायक -मोदी

नवी दिल्ली : लंडनमधील दहशतवादी हल्ले ‘धक्कादायक’ असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा निषेध केला आहे. लंडनमधील हल्ले धक्कादायक आणि वेदनादायक असून आम्ही त्यांचा निषेध करतो. या हल्ल्यांत बळी पडलेल्यांच्या कुटुंबांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो आणि जखमींसाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधानांनी एका ट्वीटमध्ये लिहिले.

 लंडन हल्ला काय घडले?

* लंडनमध्ये शनिवारी रात्री दहा वाजता दोन दहशतवादी हल्ल्यात सहा ठार. दहशतवादी हल्ले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तीन संशयित हल्लेखोरांना पोलिसांनी ठार केले.

* लंडन ब्रिज व बरो मार्केट येथे हल्ले.

* लंडन ब्रिज येथे वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला भोसकले.

* लंडन रुग्णवाहिका सेवेनुसार ४८ जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

* जखमींमध्ये फ्रेंच अधिकारी असल्याचे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी सांगितले. मुक्त समाजावरील भ्याड व क्रूर हल्ला असल्याच्या शब्दात मॅक्रॉन यांच्याकडून निषेध.

* गायज व सेंट थॉमस रूग्णालये हल्ल्याच्या भीतीने बंद.

* रात्री १० वाजून आठ मिनिटांनी लंडन ब्रिजवर एक पांढरी व्हॅन पादचाऱ्यांमध्ये घुसली.

* बरो मार्केट येथे अनेकांना भोसकण्यात आले.

* संशयित जमिनीवर पडला होता, त्याच्या अंगाला कॅनिस्टर बांधलेले होते, ते खोटे आत्मघाती अंगरखे होते.

* व्हॉक्सहॉल येथे भोसकाभोसकीचा प्रकार. दहशतवादाशी त्याचा संबंध नाही.

* हुजूर पक्षाने निवडणूक प्रचार बंद केला.

* आपत्कालीन सेवांचे मजूर पक्षाचे नेते जेरेमी कोर्बनि यांच्याकडून कौतुक.

* हल्ला भ्याड व धक्कादायक- लंडनचे महापौर सादिक खान

* हल्ल्याच्या परिसरातील हॉटेलमध्ये असलेल्या अभ्यागतांना हलवले.

* सुरक्षा दलांकडून काही स्फोटके नियंत्रित स्फोटांनी निकामी. कोब्रा समितीची आपत्कालीन बठक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 5:34 pm

Web Title: terror attack britain pm theresa may
Next Stories
1 ‘राहुल गांधींनी अमेठीतल्या चार जागा तरी जिंकून दाखवाव्यात’
2 पाकिस्तानकडून भारतीय चौक्या उद्ध्वस्त करतानाचा व्हिडीओ प्रसिद्ध
3 अमेरिकेच्या व्हिसासाठी द्यावी लागणार सोशल मीडियावरील अकाऊंट्सची माहिती
Just Now!
X