News Flash

थायलंडमध्ये लष्करी राजवट लागू

गेल्या सात महिन्यांपासून सुरू असणाऱ्या सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर थायलंडमध्ये लष्कराने देशातील संपूर्ण व्यवस्थेचा ताबा घेतला.

| May 22, 2014 07:18 am

गेल्या सात महिन्यांपासून सुरू असणाऱ्या सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर थायलंडमध्ये लष्कराने देशातील संपूर्ण व्यवस्थेचा ताबा घेतला. देशात पुन्हा एकदा स्थैर्य आणि सुव्यवस्था स्थापित करण्याच्या दृष्टीने थायलंडमध्ये लष्करी राजवट लागू करण्यात आल्याचे समजते. थायलंडचे लष्करप्रमुख जनरल प्रायुत चान-ओ-चा यांनी थायलंडमध्ये लष्करी कायदा लागू करण्यात आल्याची घोषणा केली. सध्याची परिस्थिती पाहता देशात आणखी मोठे वाद उद्भवण्यापासून रोखण्यासाठी लष्कराने देशाची सूत्रे आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तसेच देशातील नागरिकांनी शांतता पाळावी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी नेहमीच्या पद्धतीने कारभार करावा असे आवाहन लष्करप्रमुखांनी केले आहे. देशाची जर्जर झालेली व्यवस्था पूर्वपदावर आणण्यास लष्कराकडून प्राथमिक स्तरावर प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती जनरल प्रायुत चान-ओ-चा यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 7:18 am

Web Title: thailands army announces military coup
Next Stories
1 नवाझ शरीफ यांना निमंत्रण दिल्यामुळे ‘भाजप’चा दुटप्पीपणा उघड- मनिष तिवारी
2 मोदींच्या शपथविधीला यायचं हं!
3 दिल्लीसह देशभर भूकंपाचे धक्के
Just Now!
X