‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ मधील ८० टक्के दावे खोटे असल्याचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन यांनी म्हटले आहे. या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक संजय बारू यांच्यावरही नारायणन यांनी टीका केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेले बारू यांची क्षमताच नव्हती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी पैसे कमावण्यासाठी हे पुस्तक लिहिले होते, असा आरोप मनमोहन सिंग यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या नारायणन यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत चेंबर ऑफ कॉमर्स येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुस्तकातील ८० टक्के दावे खोटे आहेत. सरकारमध्ये त्यांचे तेवढे मोठे पद नव्हते तसेच त्यांना महत्वही नव्हते. माध्यम सल्लागार म्हणून त्यांचे काम ही चांगले नव्हते. यूपीएचे सरकार पुन्हा येईल, असे त्यांना वाटले नाही. त्यामुळेच ते २००८ मध्ये गेले, असे ते म्हणाले.

भारत-अमेरिका अण्वस्त्र करारात नारायणन यांची महत्वाची भूमिका होती. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला होता. जर अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरवर चित्रपट आला आहे. तर आता डिझास्टर्स प्राइम मिनिस्टरवरही चित्रपट बनला पाहिजे. तो चित्रपट भविष्यात तयार होईल, असे म्हटले होते. दुसरीकडे चित्रपटात मनमोहन सिंग यांची भूमिका निभावणारे अभिनेते अनुपम खेर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून चित्रपटगृहांची तोडफोड करत असतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The accidental prime minister former national security advisor m k narayan slammed sanjay baru author
First published on: 16-01-2019 at 15:39 IST