राफेल फायटर विमानांच्या अंबाला एअर बेसवरील लँडिंगनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अंबालामध्ये पक्षी सुरक्षित उतरले असे टि्वट केले आहे. “राफेल विमानांचे भारतात दाखल होणे ही लष्करी इतिहासातील नव्या युगाची सुरुवात आहे. या बहुउपयोगी विमानामुळे भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे” असे राजनाथ सिंह यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- २२ वर्षांनी हवाई दलाला मिळालेल्या जेटचा असा होता प्रवास

आणखी वाचा- चीनच्या स्टेल्थ J-20, पाकच्या F-16 पेक्षा राफेलच सरस, कसं ते समजून घ्या…

त्यांनी भारतीय हवाई दलाचे अभिनंदन केले. “गोल्डन अ‍ॅरोची १७ वी स्क्वाड्रन “उदयम अजाश्रम” या ब्रीद वाक्यानुसार काम करेल, याची मला पूर्ण खात्री आहे. हवाई दलाच्या युद्ध लढण्याच्या क्षमतेला योग्य वेळी बळ मिळाल्याने मला आनंद आहे” असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- फायर अँड फर्गेट: जाणून घ्या ‘राफेल’मधील घातक स्काल्प मिसाइलबद्दल

करोनामुळे वेगवेगळे निर्बंध असूनही वेळेवर राफेल विमानांची डिलिव्हरी केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी फ्रान्स सरकार आणि डासू कंपनीचे आभार मानले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे राफेल विमाने खरेदी करता आली. बऱ्याच काळापासून राफेलची खरेदी प्रक्रिया प्रलंबित होती. त्यांनी जी हिम्मत, धाडस दाखवले त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे” असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.