आज आर्थिक वर्ष २०१८-१९चा शेवटचा दिवस आहे. यावेळी आपल्या दैनंदिन जीवनातील काही टाळता न येणाऱ्या गोष्टी आहेत ज्या पूर्ण करण्याचाही आज शेवटचा दिवस आहे. या तारखांशी जोडलेली गरजेची कामे आजच उरकून घ्या, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो.

पॅनकार्ड रद्द होऊ शकते

पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची आज शेवटची तारिख आहे. जर तुम्ही हे केलं नाहीत तर १ एप्रिलपासून तुमचे पॅनकार्ड रद्द होईल आणि आपण प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करु शकणार नाहीत.

टीव्ही चॅनेलचे पॅकेज निवडण्याचा आज शेवटचा दिवस
ट्रायच्या नियमांनुसार, ३१ मार्चपर्यंत टीव्ही चॅनेल्सचे पॅकेज निवडण्याचा आजची शेवटची संधी आहे. अस केलं नाही तर एक एप्रिलपासून डीटीएच आणि सेवा विस्कळीत होऊ शकतात. यासाठी तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागू शकते.

कर्ज स्वस्त होऊ शकतं
एप्रिलपासून बँकेची कर्जे स्वस्त होऊ शकतात. बँक एमसीएलआरऐवजी रेपो रेटच्या आधारे कर्जे देतील. रिझर्व्ह बँकेचे रेपो रेट कमी केल्याने बँकांनाही कर्जाचे व्याददर कमी करावे लागतील. सध्या बँका स्वतःच निश्चित करीत असतात की व्याज कधी वाढवायचे आणि कधी कमी करायचे.

नवी नंबर प्लेट
शोरूममधून विकल्या जाणाऱ्या मोटारींवर नंबर प्लेट बसवणे एक एप्रिलपासून अनिवार्य होणार आहे. त्याचबरोबर मोटारींच्या विंडस्क्रिनवर त्याच्या इंधनाच्या प्रकाराचा उल्लेख करावा लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने विशेषतः दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि राजस्थानमध्ये हा नियम ऑक्टोबरपर्यंत लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एबीएस : दुचाकी वाहने जास्त सुरक्षित
१२५ सीसी पेक्षा अधिक क्षमता असलेल्या दुचाक्या ऑटोमोबाईल कंपन्यांना अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम देने अनिवार्य करण्यात येणार आहे. यामुळे दुर्घटना टाळता येणार आहेत. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने मार्च २०१६ मध्ये निर्देश दिले होते त्यानुसार, १ एप्रिल २०१९ नंतर दुचाक्या विकता येणार नाहीत.

बँकांचे विलनीकरण
देना बँक आणि विजया बँक या दोन्ही बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये १ एप्रिलपासून विलिनीकरण होणार आहे. या बँकांचे ग्राहक आता बँक ऑफ बडोदाचे ग्राहक म्हणून ओळखले जातील. या लाखो ग्राहकांना ही बँक नवे चेकबूक आणि एटीएम कार्ड देणार आहे.

भविष्य निर्वाह निधीचे खाते तुम्ही स्वतः ट्रान्सफर करु शकता
जर आपण १ एप्रिल नंतर नोकरी बदलणार असाल तर आपल्या जुन्या भविष्य निर्वाह निधीचे खात्यातून पैसे नव्या पीएफ खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेतून मुक्ती मिळेल. ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार, आपले नवे खाते स्वतःहून जुन्या खात्याशी जोडले जाईल. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या १२ आकडी युनिव्हर्सल अकाऊंट नंबरची मदत घेतली जाईल.

वीजेचे प्रीपेड मीटर
देशभरातील वीज ग्राहकांसाठी वीजेसाठी प्रीपेड मीटर मिळण्यास सुरुवात होईल. यामुळे ग्राहकाला जितकी वीज वापरायची असेल तितकेच बील सुरुवातीलाच भरता येईल. या मीटर्सना ऑनलाइनही रिचार्ज करता येते. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत घरांमध्ये हे मीटर बसवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.