महिलेच्या कानातील सोन्याचे कानातले चोरण्यासाठी एका चोरट्याने तिचे कानच फाडल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील पश्चिम भागात ही घटना घडली आहे. या घटनेत महिलेला इजा झाली असून तिला प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे असे पोलिसांनी म्हटले आहे. वंदना शर्मा असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचे वय ४७ वर्षे आहे. उत्तर दिल्ली भागात असलेल्या शक्ती नगरमधून ही महिला परतत होती. शक्ती नगरमध्ये ही महिला तिच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी गेली होती. तिथून परतत असताना तिला चोरट्याने लुटले आणि तिचे दोन्ही कान फाडून तिचे कानातले पळवल्याची घटना घडली आहे.

उत्तम नगर येथील मेट्रो स्टेशनच्या बाहेर पडून मी निघाले होते. त्यानंतर कोणीतरी माणूस माझ्या पाठीमागून आला आणि त्याने माझे कानातले पळवले. माझ्या डाव्या कानातील कानातले त्याने अक्षरशः ओढले ज्यामुळे माझे दोन्ही कान फाटले असेही वंदना शर्मा यांनी म्हटले आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

काहीही कल्पना नसताना अचानक झालेल्या या घटनेमुळे आणि दोन्ही कान फाटल्यामुळे मला असह्य वेदना झाल्या. माझ्या कानातील सोन्याचे इअर रिंग्ज निघत नव्हते पण तो चोरटा कान फाटेस्तोवर ते ओढत राहिला, कानातले ओढून नेलेच. ज्या चोरट्याने हे कृत्य केले तो बहुदा २० वर्षांचा असावा असेही वंदना शर्मा यांनी पोलिसांना सांगितले आहे.

ज्या असह्य वेदना झाल्या त्यामुळे माझा आवाजही फुटेना, मी मटकन खाली बसले आणि काय होते आहे याची कल्पनाच मला आली नाही. माझ्या दोन्ही कानांतून रक्त वाहू लागले त्यावेळी ही जाणीव झाली की दोन्ही कानात सोन्याचे इअर रिंग्ज होते जे चोराने लंपास केले आहेत. दरम्यान या महिलेचा कान फाडून तिचे इयर रिंग्ज लंपास करणारा हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोधही सुरु केला आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त संतोष कुमार यांनी दिली आहे. तसेच या भामट्याविरोधात कलम ३९४ अंतर्गत गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर आणि चोरीनंतर वंदना शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वंदना शर्मा यांना त्यांच्या दोन्ही कानांची प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे.