फ्रान्सकडून विकत घेतलेली अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांची तिसरी बॅच गुरुवारी भारतात दाखल झाली. नॉनस्टॉप ७००० किमीचं अंतर या विमानांनी पार केलं. दरम्यान, हवेतचं या इंधन भरण्याची कमालही या विमानांनी केली. भारतीय हवाई दलानं बुधवारी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रान्सच्या इस्ट्रेस एअर बेसवरुन निघालेली ही तीन विमानांची बॅच भारतातील एअर बेसवर दाखल झाली. या विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी युएई एअर फोर्सने पाठवलेल्या इंधन टँकरसाठी भारताने ट्विटद्वारे आभार मानले.

भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानं विकत घेतली आहेत. यांपैकी आत्तापर्यंत भारतात तीन बॅचमध्ये एकूण ९ विमानं दाखल झाली आहेत. येत्या मार्चमध्ये तीन आणखी राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यांत आणखी सात विमानं येतील. पाच विमानांची पहिली बॅच भारतात २८ जुलै रोजी दाखल झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली होती.

राफेलनं प्रजासत्ताक दिनी केलं शक्तीप्रदर्शन

भारतात दाखल झालेल्या या अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांनी पहिल्यांदा यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर आकाशात आपलं शक्तीप्रदर्शन केलं. अनेक कसरती करत या विमानांनी आपल्या ताकदीचे प्रदर्शन घडवले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three more raphael planes landed in india crossed a distance of 7000 km aau
First published on: 27-01-2021 at 21:52 IST