१. लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला कमीत कमी एक तरी जागा द्या अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. सोमवारी अमित शाह आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपाच्या युतीची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर :

२. कुलभूषण जाधव यांची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करा
भारतीय नागरिक असलेले कुलभूषण जाधव यांना ‘हास्यास्पद प्रकरणाच्या’ आधारावर दोषी ठरवणारा निकाल देणाऱ्या सुनावणीत आवश्यक त्या प्रक्रियेचे किमान निकषही पाळण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेली मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करावी आणि त्यांच्या तत्काळ सुटकेचा आदेश द्यावा, अशी विनंती भारताने सोमवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला केली. वाचा सविस्तर :

३. Pulwama Terror Attack : वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये – भज्जी
जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी CRPF जवानांवर केलेल्या हल्याने संपूर्ण देशाला हादरुन सोडले. या हल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आगामी क्रिकेट विश्वचषकात भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये अशी प्रतिक्रिया क्रिकेटपटू हरभजन सिंग उर्फ भज्जीने दिली आहे. वाचा सविस्तर :

४. ‘या’ वेबसीरिजमधून करिश्मा करणार कमबॅक
‘झुबैदा’, ‘हिरो नंबर १’, ‘हम साथ साथ है’ यांसारख्या चित्रपटातून विविध भूमिका साकारत प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री करिश्मा कपूरचा आता कलाविश्वात म्हणावा तसा वावर राहिलेला नाही. बॉलिवूडच्या लोलोने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून फारकत घेतली आहे. करिश्मा पडद्यावर जरी झळकत नसली तरीही ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. मात्र आता करिश्मा लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. वाचा सविस्तर :

५. चिदम्बरम पितापुत्रांना अटकेपासून संरक्षणात मुदतवाढ
सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाने एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्यात दाखल केलेल्या गुन्ह्य़ाच्या प्रकरणात केंद्रीय मंत्री पी.चिदम्बरम व त्यांचे पुत्र कार्ती यांना ८ मार्चपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आले आहे. दिल्ली न्यायालयाने हा आदेश जारी केला आहे. सक्तवसुली संचालनालयाने विशेष न्यायाधीश ओ.पी.सैनी यांना सांगितले की, कार्ती चिदम्बरम यांनी ५,६,७ व १२ मार्च रोजी जाबजबाबासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर :