१. पटेलांचा पुतळा उंच ठरावा म्हणून शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटणे हे विकृत मनाचे लक्षण – उद्धव ठाकरे
शिवस्मारकाच्या उभारणीला होणारा विलंब आणि शिवरायांच्या पुतळयाच्या उंचीवरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. ‘पटेलांचा पुतळा हा जगात ‘लय भारी’ ठरावा म्हणून मुंबईच्या समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटली’’ असा नवा आरोप राष्ट्रवादीचे प्रांतीय अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला व तो खरा ठरावा अशा घटना घडत आहेत. वाचा सविस्तर :

२. रिझव्‍‌र्ह बँकेची आज बैठक, सरकारशी संघर्षांची शक्यता
राखीव निधी किती प्रमाणात ठेवावा या मुद्दय़ावरून सरकारबरोबर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रिझव्‍‌र्ह बँकेच्या मंडळाची बैठक सोमवारी (आज) होत असून त्यात राखीव निधी फेररचना करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.वाचा सविस्तर :

३. राष्ट्रवाद कोणाचा तिरस्कार करायला लावत असेल तर धोकादायक – जावेद अख्तर
तुमच्या विचारांशी एखादी व्यक्ती असहमत असेल किंवा मतभिन्नता असेल तर त्या व्यक्तीचा तुम्ही किती द्वेष करता त्यावर तुमचे देशप्रेम ठरवले जाते. हे योग्य नाही असे मत गीतकार, लेखर आणि माजी खासदार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. ते साहित्य आजतक कार्यक्रमात बोलत होते. तुम्ही तुमच्या पालकांवर प्रेम करता तसेच देशावर प्रेम करणे ही नैसर्गिक भावना आहे. वाचा सविस्तर :

जावेद अख्तर

४.विराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल – पॅट कमिन्स
स्पर्धात्मकतेचा अनुभव घेण्यासाठी मैदानावर शाब्दीक वादावादी, संघर्ष करण्याची गरज नाही असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले होते. पण कोहलीच्या या विधानावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला अजिबात विश्वास नाहीय. विराट कोहली ऑस्ट्रेलियात येऊन शांत राहिला तर आपल्याला आश्चर्य वाटेल. तो स्पर्धक असून त्यात तो यशस्वी सुद्धा होतो असे कमिन्स फेअरफॅक्स मीडियाशी बोलताना म्हणाला. वाचा सविस्तर :

५. दुधात भेसळ केल्यास जन्मठेप
दूध तसेच अन्य अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी यासाठी कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. वाचा सविस्तर :