05 March 2021

News Flash

जैशच्या बॉम्ब एक्सपर्टचा खात्मा, पण अजूनही पुलवामा सारख्या मोठया हल्ल्याचा धोका कारण…

मसूद अझहरला मोठा झटका

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या एन्काऊंटरमध्ये सुरक्षा दलांनी फौजी भाई ऊर्फ अब्दुल रेहमानचा खात्मा केला. मसूद अझहर आणि त्याच्या जैश-ए-मोहम्मदसाठी हा मोठा झटका आहे. कारण अब्दुल रेहमान बॉम्ब बनवण्यामध्ये मास्टर होता. बुधवारी पहाटे सुरु झालेल्या या एन्काऊंटरमध्ये सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफ असे तिघांनी मिळून हे ऑपरेशन केले. भारतीय सुरक्षा यंत्रणा या फौजी भाई ऊर्फ इस्माइलच्या मागावर होत्या. पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा येथे २७ मे रोजी कार बॉम्ब प्रकरणाशी तो संबंधित होता. “मूळचा पाकिस्तानी असलेल्या या अब्दुल रेहमानने तीन कारमध्ये आईडी स्फोटके भरल्याची माहिती आहे. त्यातली एक कार २७ मे रोजी आम्ही जप्त केली. पण अजून दोन कारबद्दल समजू शकलेले नाही. बडगाम, कुलगाममध्ये कुठेतरी या गाडया असू शकतात” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितले.

आणखी वाचा- सैन्याचं मोठं यश! एकाचवेळी जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

२७ मे रोजी सुरक्षा दलांनी स्फोटकांनी भरलेली सेंट्रो कार जप्त केली. जैशचा दहशतवादी समीर अहमद दारकडे ही कार नेत असताना जप्त करण्यात आली. समीर अहमद दार हा आदिल दारचा नातेवाईक आहे. याच आदिल दारने मागच्यावर्षी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या बसला धडकवली होती. ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 4:59 pm

Web Title: top jaish bombmaker killed hunt for 2 missing car bombs in kashmir is on dmp 82
Next Stories
1 देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश
2 राष्ट्रवादीनं गुजरातमध्ये नेतृत्वात केला बदल; राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतला निर्णय
3 भारतात ६० वर्षाच्या पुढच्या वयोगटात करोनामुळे ५० टक्के मृत्यू
Just Now!
X