News Flash

नव्या करोनानेही देशात पसरले हातपाय; रुग्णांची संख्या पोहोचली २० वर

ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली

संग्रहीत

भारतात करोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग हळूहळू पसरत असल्याचं दिसत आहे. ब्रिटनहून आलेल्या २० प्रवाशांमध्ये आतापर्यंत करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आलेला आहे. यामध्ये देशातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांमध्ये आढळलेल्या सहा जणांचा समावेश आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेली आहे.
सध्या ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

कोलकात्तामध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रकार समोर आला आहे. ब्रिटनहून आलेल्या एका व्यक्तीमध्ये या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळली आहेत. ज्याला आता क्वारंटाईन करण्यात आले आहे. जीनोम स्किवेंसिंगनंतर स्ट्रेन आढळला, मागील आठवड्यातच हा व्यक्ती यूकेवरून परतला होता.

कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी माहिती दिली आहे की, राज्यात जवळपास ७ लोकांमध्ये नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळली आहेत. ३ बंगळुरू व ४ शिमोगामधील आहेत. तर, जी लोकं शिमोगामध्ये पॉझिटिव्ह आढळली आहेत, त्यांच्या संपर्कातील काही लोकांना देखील करोना झालेला आहे.

ब्रिटन-भारत विमानसेवा बंद; नव्या करोनामुळे केंद्राचं महत्त्वाचं पाऊल

मागील काही दिवसांपासून ब्रिटनहून येणाऱ्या सर्वांची तपासणी केली जात आहे. जी लोकं करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळत आहेत, त्यांची जीनोम स्किवेंसिंग करून करोनाच्या नव्या स्ट्रेनचा शोध घेतला जात आहे. मंगळवारी उत्तर प्रदेशमधील मरेठ येथे दोन वर्षीय मुलीमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला होता. मुलीचे कुटुंब ब्रिटनहून परतले होते. त्यानंतर मुलीसह तिचे आई-वडील पॉझिटिव्ह आढळले होते. तर, नवा स्ट्रेन मात्र केवळ दोन वर्षीय मुलीतच आढळला होता.तर, बुधवारी बंगळुरु, पुणे आणि हैदराबादच्या प्रयोगशाळांमध्ये करोनाच्य नव्या स्ट्रेनची प्रकरणं समोर आली होती. ब्रिटनपासून सुरू झालेला करोनाचा हा नवा स्ट्रेन सध्या असलेल्या करोना व्हायरसपेक्षा ७० टक्के अधिक भयानक आहे.
करोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही पाऊलं ठेवलं आहे. भारतात जवळपास २० करोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात करोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

दरम्यान, काही दिवासांपूर्वीच आरोग्यमंत्रालयाने आश्वासन दिलं आहे की, करोना वॅक्सीन या नव्या स्ट्रेनवर देखील परिणामकारक आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. भारतात मागील महिनाभरात जवळपास ३० हजारांच्या आसपास नागरिक यूकेवरून परतले आहेत, ज्यामध्ये शंभराहून अधिक जण करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांची जिरोम स्किवेंसिंग केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 12:26 pm

Web Title: total of 20 persons have been found with the mutant variant of sars cov 2 virus reported from the united kingdom msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नव्या करोनामुळे केंद्राचं महत्त्वाचं पाऊल, ब्रिटन-भारत विमानसेवा बंदी वाढवली
2 “राज्यघटनेचा पुन्हा अभ्यास करा”; योगी आदित्यनाथांना १०४ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचं सणसणीत पत्र
3 विवाहासाठी धर्मांतर मंजूर नाही; राजनाथ सिंह
Just Now!
X