सध्या शाळा-महाविद्यालये यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा पर्यटन स्थळांकडे वळविला आहे. यातील अनेक जण पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी ट्रॅव्हल कंपनीचा आधार घेत देशाबाहेर फिरण्यासाठी जातात. मात्र आपल्याच देशात राहून परदेशवारीचा आनंद घेता येईल अशी अनेक  ठिकाणं पहायला मिळतील. परंतु या ठिकाणांकडे अनेकवेळा दुर्लक्ष केल्याचे पहायला मिळते.

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक फॅमेलीज हिलस्टेशनला विशेष प्राधान्य देताना दिसून येतात. येतं. अशीच काही ठिकाणांना भेट द्यायची असेल तर प्रामुख्याने उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेश याकडे पर्यटकांचा अधिक कल असतो. मात्र याठिकाणांच्या व्यतिरिक्त कर्नाटक हे असे राज्य आहे जिथे हिलस्टेशनचा एकप्रकारे खजिनाच आहे. मात्र त्याकडे कधी पाहिलेच गेले नाही.

१. नंदी हिल – कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण म्हणजे नंदी हिल्स. या ठिकाणी एक प्राचीन किल्ला आहे. या किल्ल्याने अद्यापही आपले सौंदर्य जपून ठेवले आहे. येथे गेल्यानंतर मानसिक शांतता मिळते. विशेष म्हणजे येथील रस्ता हा रोमांचकारी असल्यामुळे या ठिकाणांना भेट देणा-या पर्यटकांमध्ये सर्वाधिक संख्या   बायकर्सची संख्या जास्त असते.

२. कुर्ग – जगातील महत्वाच्या हिल स्टेशनमध्ये कुर्ग या हिलस्टेशनचे नाव आवर्जुन घेतले जाते. या हिल स्टेशनला नैसर्गिक सुंदरता लाभली आहे. या ठिकाणी गेल्यावर नजर जाईल तिथंपर्यंत चहुबाजूने हिरवळ दिसून येते. एवढेच नाही तर उंच उंच पठार पहायचे असतील तर या हिलस्टेशनला आवश्य  भेट द्यावी. याठिकाणी गेल्यावर पर्यटकांनी अॅबे फॉल्स, इरुप्पु फॉल्स या ठिकाणांची आवर्जुन सफर करावी तसेच बारापोला नदीमध्ये राफ्टिंग आणि क्वाड बाइकिंगचा आनंदही पर्यटकांना घेता येईल.

३. चिकमगलुर – चिकमगलुर या ठिकाणी अनेक जण सायकलिंग करण्यासाठी येतात. याठिकाणी पर्वताच्या टोकापर्यंत ट्रकिंग करत जाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. तसेच अनेक पर्यटक येथे रात्री नाईटआऊट करण्यासाठी येतात. रात्री मोकळ्या आकाशात चांदण्या मोजायच्या असतील तर या सारखे दुसरे कोणतेच ठिकाण नाही. तसेच  श्रृंगेरी मठ आणि हनुमान गुंडी फॉल्स या ठिकाणीही पर्यटकांची झुंबड उडाली असते.

४. अंगुबे – कर्नाटकातील उडुपीपासून ४५ किलोमीटर अंतरावर अंगुबे हे ठिकाण लागतं. हे ठिकाण दक्षिण भारतातील ‘चेरापुंजी’ या नावाने देखील ओळखले जाते. या ठिकाणी उन्हाळ्याबरोबरच पावसाळ्यातही मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात. हे ठिकाण ‘वर्षा वन’ म्हणजेच ‘रेनफॉरेस्ट’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यामुळे जर आपल्या कुटुंबासोबत कुठे फिरायचं असेल तर हे ठिकाण नक्कीच योग्य आहे.

५. कोडाक्षाद्री – समुद्राच्या पातळीपासून १३०० मीटर उंचावर वसलेल्या कोडाक्षाद्री हे ठिकाण ट्रेकर्ससाठी सर्वोंत्तम मानलं जातं. या ठिकाण पोहोचायचं असेल तर मॅंगलोरवरुनहून जाण्यासाठी सोय आहे. हे ठिकाण मॅंगलोरपासून १६० किलोमीटर दूर अंतरावर आहे. याठिकाणी अनेक जण वेस्टर्न घाट आणि सुर्यास्त पहायला खास करुन येतात. त्यामुळे जर पर्यटकांना सुट्टीचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर देशाच्या बाहेर न जाता आपल्याच देशातील या ठिकाणांना नक्की भेट द्या.