News Flash

डिजिटल नियमांचे पालन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न; ट्विटरचे आश्वासन

डिजिटल नियम २०२१ चे पालन करण्यासंबंधी सोशल मीडिया कंपनी ट्विटर आता नरम होताना दिसत आहे.

डिजिटल नियमांचे पालन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न; ट्विटरचे आश्वासन (सौजन्य- Indian Express)

डिजिटल नियम २०२१ चे पालन करण्यासंबंधी सोशल मीडिया कंपनी ट्विटर आता नरम होताना दिसत आहे. डिजिटल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलली जात आहेत, असे ट्विटरने सरकारला सांगितले. तसेच याबाबत एका आठवड्यात नवीन डिजिटल नियमांचे पालन करण्याबाबत झालेल्या प्रगतीचा तपशील सरकारला सादर करु, असे ट्विटरने स्पष्ट केले.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटविल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला डिजिटल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

फेसबुक, गुगल यासह अनेक कंपन्यांनी डिजिटल नियमांनुसार तक्रार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासारखी अनेक पावले उचलली आहेत. परंतु ट्विटर आणि सरकारमधील संघर्ष कमी होताना दिसत नव्हता. दरम्यान, ट्विटरच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, त्यांची कंपनी भारतातील सेवांबद्दल वचनबद्ध आहे आणि एक महत्त्वपूर्ण जनसंवाद मंच म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. मार्गदर्शक तत्त्वाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आश्वासन सरकारला देण्यात आले आहे. आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा तपशील सरकारला सांगण्यात आला आहे. आम्ही भारत सरकारशी संवाद सुरु ठेवू तसेच एका आठवड्या कंपनी सरकारला नवीन निर्णयांचा अहवाल सादर करु, असे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा – ट्विटरकडून चूक दुरुस्त! उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटला पुन्हा ‘ब्लू टिक’

गेल्या दीड वर्षात भारत सरकार व ट्विटर यांच्यात अनेक विषयांवर तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. ट्विटर टूल किटचा मुद्दा सर्वप्रथम शेतकरी चळवळीच्या वेळी समोर आला. त्यानंतर कॉंग्रेसच्या कथित टूलकिट संदर्भात भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटर देखील गंभीर आरोप केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 9:57 pm

Web Title: twitter explanation to the government regarding compliance with digital rules srk 94
Next Stories
1 टीव्ही अभिनेत्यानं Facebook Live मध्येच केला आत्महत्येचा प्रयत्न! चाहत्यामुळे वाचला जीव!
2 American Research: घरात विनामास्क बोलण्याने करोना पसरण्याचा जास्त धोका
3 दिल्ली : गायब झालेला रॅप गायक MC Kode अखेर सापडला! इन्स्टावर केली होती सुसाईड पोस्ट!
Just Now!
X