08 July 2020

News Flash

जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त

संग्रहीत

जम्मू -काश्मीरमधील अनंतनाग येथे लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यावेळी झालेल्या कारवाईत घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणवर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला.

जम्मू-काश्मीरमधील बिजबेहरा येथील संगम भागात ही चकमक झाली. ज्यामध्ये दोन्ही बाजुंनी मोठ्याप्रमाणावर गोळीबार झाला, जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

एएनआय वृत्तसंस्थेने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात सांगितलं की, स्थानिक पोलीस, सीआरपीएफ आणि जवानांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. यावेळी घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला.दहशतवाद्यांनी मध्यरात्रीनंतर या परिसरात गोळीबार सुरू केला होता. यानंतर जवानांकडून संयुक्त मोहीम राबवण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 7:32 am

Web Title: two lashkar e taiba let terrorists have been killed in the operation msr 87
Next Stories
1 नागरिकत्व कायद्याची भीती नको!
2 पाकिस्तान ‘करडय़ा यादी’तच कायम
3 ‘सीएफएसएल’ अहवालाअभावी गुमनामी बाबांचे गूढ कायम
Just Now!
X