राज्याच्या अब्रुची लक्तरे निघाली असून आता महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीयमंत्री व भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी केली. अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी न्यायालयाला लिहिलेले पत्र गंभीर असून महाविकास आघाडी हे वसुली सरकार बनले असल्याचे स्पष्ट झाले आहे. लुटीशिवाय राज्यात काहीही झाले नाही. महाविकास आघाडीला लोकांनी निवडून दिलेले नव्हते. शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र हाती घेऊन जागा जिंकल्या. त्यानंतर भाजपशी गद्दारी करून सरकार बनवले, असा आरोप जावडेकर यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2021 रोजी प्रकाशित
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा
प्रकाश जावडेकर यांची मागणी
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-04-2021 at 00:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray should resign prakash javadekar abn