पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांचा मुलगा अली हैदर गिलानी याचे अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गुरुवारी पंजाब प्रांतातून अपहरण केले. त्यांनी अली यांचा अंगरक्षक आणि स्वीय सहायकाची गोळ्या घालून हत्या केली. अली हे मुलतान येथे प्रचार सभा घेत असताना हा प्रकार घडला. बंदुकधाऱ्यांनी सभेसाठी आलेल्यांवर बेछूट गोळीबार केला. त्यात इतर पाच जण जखमी झाले. ही हत्या घडविल्याचा दावा कोणत्याही अतिरेकी गटाने केलेला नाही. बंदुकधारी कारमधून सभेच्या ठिकाणी आले होते. त्यांनी अली यांना गाडीत बसण्यास भाग पाडले, असे ही घटना पाहणाऱ्या एका नागरिकाने सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 12:09 pm