उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एक किशोरवयीन मुलगी सामाजिक रुढी आणि कौटुंबिक परंपरेचा बळी ठरली आहे. उत्तर प्रदेशच्या देवरियामधे हा अतिशय लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. देवरियामध्ये एका कुटुंबातील आजोबा आणि काकांनी त्यांच्या स्वत:च्या घरातील १७ वर्षीय मुलीची हत्या केली आहे. सांवरेजी खारग गावात राहणारी १७ वर्षीय मुलीने जीन्स आणि टीशर्ट घातल्याने कुटुंबातील आजोबा आणि काकांनी तिला काठीने मारहाण करत हत्या केली. सहमती नसताना तिने जीन्स घातली होती. ही मुलगी लुधियानामध्ये शिकत होती आणि आजोबांनी नकार दिल्यानंतरही तिने जीन्स व इतर वेस्टन कपडे घालण्याचे धाडस केले. जेव्हापासून ती गावी परत आली तेव्हापासून तिच्यावर सतत निळ्या जीन्स घालू नये म्हणून दबाव येत होता. जेव्हा मुलीने ऐकले नाही, तेव्हा तिला मारहाण केली गेली आणि नंतर तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीच्या आजोबा आणि काकांनी तिला घरात जीन्स घालू नको असे सांगितले होते, पण मुलीने त्यांचे ऐकले नाही. यामुळे दोघांनाही राग आला आणि त्याने मारहाण करण्यास सुरवात केली. यादरम्यान, मुलीचे डोकं भिंतीवर आदळले आणि रक्त वाहू लागले. मुलगी जखमी झाल्याचे पाहिल्यानंतरही आजोबा आणि काका तिला रुग्णालयात घेऊन गेले नाहीत. त्यातच मुलीचा मृत्यू झाला.

मृतदेह पुलावरून फेकला पण ग्रिलमध्ये अडकला

मुलीच्या मृत्यूनंतर पोलिंसापासून वाचण्यासाठी आरोपींनी तिचा मृतदेह कासिया-पटना महामार्गावरील पाटना पुलावरून फेकला. मात्र, पूलाच्या ग्रिलवर मृतदेह अडकला. मृतदेह तेथे काही तास लटकत राहिला. त्यानंतर तेथून जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने लुधियाना येथेच जीन्स आणि टॉप घालण्यास सुरुवात केली होती. जेव्हा ती आपल्या आईसह मूळ गावी परत आली तेव्हा तिच्या काका आणि आजोबांनी तिला ओढणी सलवार-सूट घालण्यास भाग पाडले. मात्र, मुलीने त्याचे म्हणणे ऐकले नाही आणि घराबाहेर अधिक वेळ घालवायला सुरुवात केली.

मुलीच्या आजोबाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आजोबा हे रिक्षा चालक आहे. मुलीचे काका अद्याप फरार आहेत. मुलीच्या आईने याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती दिलेली नाही. पण शेजार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने पाश्चात्य कपडे परिधान केल्याबद्दल आजोबा व काका खूप रागावले होते आणि यापूर्वीही तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.