पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला निर्यात करणाऱ्या करण्यात येणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के कस्टम ड्युटी आकारली आहे. पाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूंवरील कस्टम ड्युटीत वाढ केल्याने कांदा, साखर, मसाल्याचे पदार्थ भारताकडून घेण्यासाठी पाकिस्तानला जास्त किंमत चुकवावी लागणार आहे. कारण या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्यात आली आहे.

ही वाढ त्वरित लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कांदा, साखर, मसाल्याचे पदार्थ यांवरची कस्टम ड्युटी वाढण्याची चिन्हं आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी ट्विट करून दिली आहे.

भारत पाकिस्तानला साखर, चहा, ऑइल केक, पेट्रोलियम ऑइल, कॉटन, टायर, रबरसह जवळपास 14 वस्तू निर्यात करतो. या वस्तूंवरची कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे पाकिस्तानला भारताकडून घ्याव्या लागणाऱ्या या वस्तूंवर दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर वाईट प्रभाव पडणार आहे. तसेच पाकिस्तानकडून आयात करण्यात आलेल्या सिमेंटवरही भारताला जास्त पैसे मोजावे  लागण्याची शक्यता आहे