News Flash

२६/११ च्या तपासात भारताला सहकार्य करा, अमेरिकेचा पाकला दम

मुंबईवर झालेला २६/११ दहशतवादी हल्ला हा भयावह होता.

पाकिस्तानच्या भूमीत शिजणाऱया दहशतवादी संघटनांच्या मनसुब्यांना तेथील सरकारने आळा घातलाच पाहिजे, असे अमेरिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.

मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या तपासात भारताला सहकार्य करा आणि तुमच्या देशात सुरु असलेल्या दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवा, असा दम अमेरिकेने पाकिस्तानला दम भरला आहे.
मुंबईवर झालेला २६/११ दहशतवादी हल्ला हा भयावह होता. त्यामुळे या प्रकरणात पीडितांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही वेळोवेळी पाकिस्तान सरकारला भारतीय तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची विनंती करत आलो आहोत. या हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानने भारताला पूर्णपणे सहकार्य करायला हवे. पाकिस्तानच्या भूमीत शिजणाऱया दहशतवादी संघटनांच्या मनसुब्यांना तेथील सरकारने आळा घातलाच पाहिजे, असे अमेरिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2016 1:34 pm

Web Title: us asks pakistan to cooperate with india on 2611 probe
टॅग : Loksatta,Pakistan,Us
Next Stories
1 ममता बॅनर्जी सलग दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
2 खूप वर्षांनी देशात सक्षम आणि निर्णायक सरकार, अमित शहांकडून स्तुती
3 ‘नीट’च्या अध्यादेशाला तातडीने स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
Just Now!
X