01 March 2021

News Flash

अमेरिकेत ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; जो बायडन म्हणाले…’हा विरोध नव्हे देशद्रोह’

"जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत"

(File Photo : AP )

अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालानंतरही अमेरिकेत राजकीय तणाव सुरु असून मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून जोरदार गोंधळ घातलाय. निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये घुसले, परिणामी संसदेचं कामकाज थांबवावं लागलं.

कॅपिटॉल बिल्डिंगबाहेर ट्रम्प समर्थकांची पोलिसांसोबत झटापटही झाली. या हिंसाचारात एका आंदोलनकर्त्याचा गोळी लागून मृत्यू झाला. तर, काही जण जखमी झाल्याचं समजतं. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जवळपास चार तास झटापट सुरु होती. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुन्हा एकदा कॅपिटॉल इमारतीभोवती सुरक्षाव्यवस्था सुरळीत केली. यावरुन निवडून आलेले अध्यक्ष जो बायडन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हा विरोध नसून देशद्रोह आहे अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. “कॅपिटॉल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत. कायदा न मानणाऱ्यांची ही छोटी संख्या आहे…हा देशद्रोहाचा मार्ग आहे आणि तो थांबला पाहिजे”, असं बायडेन म्हणालेत.

आणखी वाचा- US Capitol मध्ये डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा गोंधळ, वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लागू

आणखी वाचा- अमेरिकेत अभुतपूर्व सत्तासंघर्ष, ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; संसदेत घुसून तोडफोड

दरम्यान या घटनेनंतर फेसबुक आणि ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ट्विटर आणि फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट ब्लॉक केलं आहे. हिंसाचार सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडीबाबात केलेल्या निराधार आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली. ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट बारा तासांसाठी, तर फेसबुकने 24 तासांसाठी लॉक केले आहे. नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा ट्विटरने दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 9:02 am

Web Title: us capitol building violent protests by pro trump demonstrators joe bidens says chaos at the capitol do not represent who we are it borders on sedition sas 89
Next Stories
1 अमेरिकेत ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान मोदींचे भाष्य; म्हणाले…
2 फेसबुक आणि ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई
3 २२ लाखांचे TV, ११ लाखांच्या चादरी अन् बरंच काही; मुख्यमंत्री असताना मुफ्तींनी ६ महिन्यात केला ८२ लाखांचा खर्च
Just Now!
X