राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधानांचे आवाहन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वादग्रस्त मुद्दय़ांचा उल्लेख टाळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांनी केवळ घोषणाबाजीवर अवलंबून नआसाममधील विजय तसेच केरळ व पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे. राहता, राष्ट्र बलवान कसे होईल याचा ध्यास घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप पंतप्रधानांच्या भाषणाने झाला. त्यात पक्ष कार्यकर्त्यांना सप्तसूत्री दिली.

पंतप्रधानांनी छत्रपती शिवरायांचा उल्लेख करत, महाराजांनी सत्तेचा उपयोग जनतेच्या भल्यासाठी केला, त्यांचे आदर्शवत वर्तन होते. मात्र काही जण  हाती सत्ता नसतानादेखील सूत्रे हातात ठेवून लाभ उठवतात असा टोला गांधी कुटुंबीयांना पंतप्रधानांनी लगावला. आसाममधील विजय तसेच केरळ व पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे. त्यातून आपली जबाबदारी वाढली आहे. अनेक वर्षांपासून कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचे हे फळ आहे. मात्र सत्तेचे दुर्गुण आपल्याला चिकटता कामा नयेत असा इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

कार्यकर्त्यांसाठी सप्तसूत्री

भाजप कार्यकर्त्यांनी सात सूत्रे आचरणात आणावीत असे आवाहन मोदींनी केले. त्यात सेवाभाव, संतुलन, समन्वय, संयम, सकारात्मक, सद्भावना व संवाद या सात बाबींचे प्रतिबिंब व्यवहारात व धोरणात पडले पाहिजे अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केल्याचे अर्थमंत्री जेटली यांनी स्पष्ट ्रकेले.

देश बळकट करण्याची गरज आहे. केवळ घोषणांनी जनतेचे समाधान होत नाही. देश कसा बळकट होईल याची सामान्यांना चिंता  असते.
– नरेंद्र मोदी

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use power for society issue says narendra modi
First published on: 14-06-2016 at 03:00 IST