18 September 2020

News Flash

व्हिडीओ व्हायरल!…निवडणूक अधिकारीच देत होते ‘कमळा’ला मत, महिलेचा गंभीर आरोप

मायावतींची समर्थक असल्याचा दावा

उत्तर प्रदेशात ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप ही महिला व्हायरल झालेल्या व्हिडीओतून करत आहे.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान यंत्रात ‘घोटाळा’ झाल्याची जोरदार चर्चा असताना, मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांनीच ईव्हीएमवरील ‘कमळ’ बटण दाबले; तसेच भाजपला मत देण्यासाठी अधिकारी महिला मतदारांवर दबाव आणत होते, असा गंभीर आरोप एका महिलेने व्हिडीओतून केला आहे. हा खळबळजनक व्हिडीओ ‘इंडिया अगेन्स्ट बीजेपी’च्या यू-ट्युब पेजवरून अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सहा लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. ‘यूपी मे ईवीएम गडबडी का सबूत’ या नावाने हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

काय म्हणतेय ‘ती’ महिला!

निवडणूक अधिकारी स्वतःच ईव्हीएम मशीनवरील ‘कमळा’चे बटन दाबून मत देत होते. मतदानासाठी गेलेल्या महिलांना ते मशीन सुरू होत नाही, असे सांगत होते. पण दुसरीकडे ते अधिकारी मशीनच सुरू करत नव्हते. मतदारांवर दबाव आणून स्वतःच मतदान करत होते. कमळ या चिन्हालाच मत दिले जात होते. १०० मीटरवर कुणीही थांबू नये. पण काही लोक बिनधास्तपणे वावरत होते. चहा-पाणी सर्व काही होत होते. पोलीसही त्यांनाच साथ देत होते, असे या व्हिडीओत ती सांगत आहे. कुणाला मत देणार आहेस, असे विचारले असता, मायवतींची समर्थक असून, त्यांच्या पक्षाच्या हाजी नामक उमेदवाराला मत देणार आहे, असे ही महिला सांगत आहे.

हा पाहा व्हिडीओ

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने ३१२ जागांवर विजय मिळवला आहे. त्यानंतर बसपच्या नेत्या मायावती यांनी ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा आरोप करून पुन्हा निवडणुका घेण्याचे आव्हान भाजपला दिले होते. अखिलेश यादव आणि लालूप्रसाद यादव यांनीही मायवती यांनी केलेल्या आरोपाचे समर्थन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2017 6:42 pm

Web Title: uttar pradesh election 2017 evm scam in up alleged women voter from viral video
Next Stories
1 उत्तर प्रदेश मुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ नवीन चेहऱ्याची चर्चा
2 चुकीच्या धोरणांमुळे तुमचा पराभव; अरुण जेटलींनी मायावतींना सुनावले
3 जातीच्या गणितातून बाकी शून्य
Just Now!
X