04 July 2020

News Flash

गंमतीत ५० अंडी खाण्याची पैज महागात, ४२ वं अंडं खाताच…

शुक्रवारी संध्याकाळी सुभाष हे मित्रासोबत अंडी खाण्यासाठी बाजारात गेले होते...

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मित्राशी गंमतीत लावलेली पैज मृत्यूचं कारण ठरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचा ५० अंडी खाण्याच्या पैजेपायी मृत्यू झालाय. न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे ही घटना घडली आहे.

शुक्रवारी(दि.१) संध्याकाळी सुभाष यादव (४२) नावाचा व्यक्ती अंडी खाण्यासाठी मित्रासोबत बीबीगंज बाजारात गेले होते. अंडी खाताना, कोण किती अंडी खाऊ शकतं याबाबत दोघांमध्ये चर्चा सुरू होती आणि गंमती गंमतीत दोघांमध्ये अंडी खाण्यावरुन पैज लागली. ५० अंडी आणि एक बाटली दारु पिण्याची ही पैज जिंकण्यास दोन हजार रुपये देण्याचं ठरलं.

सुभाषने पैज मान्य केली आणि अंडी खायला सुरूवात केली. त्यांनी ४१ अंडी खाल्ली, पण ४२ वं अंडं खाताच ते बेशुद्ध झाले. तेथे उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती गंभीर असल्याचं पाहून तेथून सुभाष यांना लखनऊच्या रुग्णालयात हलवलं. तेथे रात्री उशीरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुभाष यांनी याच वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं होतं. पहिल्या पत्नीपासून चार मुली झाल्यामुळे मुलासाठी त्यांनी नऊ महिन्यांपूर्वीच दुसरा विवाह केला होता. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष यांची दुसरी पत्नी सध्या गर्भवती आहे. परिसरात ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2019 1:09 pm

Web Title: uttar pradesh jaunpur man died during bet of eating 50 eggs sas 89
Next Stories
1 कर्मचाऱ्यासोबत सहमतीने संबंध, तरीही.. ‘मॅकडोनाल्ड्स’च्या सीईओंची हकालपट्टी
2 तातडीने अपडेट करा Google Chrome , हॅकिंगपासून वाचण्यासाठी ‘गुगल’चा सल्ला
3 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी, Vivo U10 आता ‘ओपन सेल’मध्ये उपलब्ध
Just Now!
X