News Flash

‘हिंदीमुळे संसदेतील चर्चेचा दर्जा घसरला, संस्कृत ही मृत भाषा’

एमडीएमकेचे खासदार वायको यांचे वादग्रस्त विधान

तामिळनाडूतील मरुमलारची द्रविड़ मुनेत्र कळघम (एमडीएमके) चे प्रमुख  व राज्यसभा खासदार वायको यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.  संसदेत हिंदी भाषेत केल्या जाणाऱ्या भाषणांमुळे संसदेतील चर्चेचा स्तर खालावला असल्याचे सांगत, त्यांनी हे देखील विचारले की हिंदीत कोणते साहित्य आहे? तिची काहीच पाळमुळ नाहीत. तर संस्कृत एक मृत भाषा असल्याचेही ते म्हणाले. तसेच  पूर्वी संसदेत विविध विषयांचे सखोल ज्ञान असलेल्यांना पाठवले जात होते. मात्र आज संसदेतील चर्चांची पातळी हिंदीमुळे खालवली आहे. ते केवळ हिंदीत आरडाओरडी करतात. एवढेच नाहीतर पंतप्रधान मोदी देखील हिंदीतच भाषण करतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

वायको यांनी जवाहरलाल नेहरू एक महान लोकशाहीवादी होते व त्यांनी क्वचितच कधीतरी संसदेचे सत्र सोडले असेल. मात्र मोदी कधीतरी संसदेच्या सत्रात सहभाग नोंदवतात असे म्हटले. तसेच पंतप्रधान मोदी आणि नेहरू यांची तुलना करत नेहरू पर्वत होते तर मोदी केवळ त्याचा एक हिस्सा असल्याचेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 8:48 pm

Web Title: vaiko mdmk chief what literature is there in hindi it has no roots sanskrit is a dead language msr 87
Next Stories
1 सपाचे खासदार नीरज शेखर यांचा राज्यसभेचा राजीनामा
2 गुजरात : अल्पेश ठाकोर, धवलसिंह झाला लवकरच भाजपात
3 ‘भारत सोडणं मोठी चूक, २४ तासांत परतणार’, IMA घोटाळ्यातील आरोपी मन्सूर खानचा दावा
Just Now!
X