नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे जणू भक्तीची नऊ रूपेच. सध्या देशभरात नवरात्रीची उत्साह सुरू आहे. दुर्गा म्हणजे शक्ती. या शक्तीची आराधना देशभरात विविध पध्दतीने केली जाते. भक्त देवीची स्थापनाही मनोभावाने करतात. आंध्र प्रदेशमधील अशाच एका देवीला वेगळ्या पद्धतीने सजवले आहे. चार कोटी रूपये आणि चार किलो सोन्याने देवीचे मंदिर सजवले आहे. मंदिराला करण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या सजावटीमुळे सध्या ही देवी चर्चेचा विषय ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम येथील वासवी कन्यका परमेश्वरी मंदिराची सजावट पैसे आणि सोन्याने केली आहे. आकर्षक सजावटीसाठी
चार कोटी रूपयांच्या नोटा आणि चार किलो सोने वापरले आहे. मंदिरात असलेल्या देवीला वस्त्रे आणि आभूषणाने सजवण्यात आले आहे. यासाठी चार किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. तर देवीच्या पाठीमागे आणि मंदिर परिसरात चार कोटी रूपयांच्या नोटांचा वापर करून सजावट करण्यात आली आहे.

 

प्रत्येकवर्षी वासवी कन्यका परमेश्वरी देवीच्या मंदिराची सजावट खास पद्धतीने केला जातो. देवीचे हे मंदिर १३० वर्ष प्राचिन आहे. सोशल मीडियावर सोने आणि रूपये वापरून केलेला देखावा चांगलाच व्हायरल झाला आहे.

तामिळनाडू, कर्माटकातील काही भाग व आंध्र प्रदेशात या उत्सवास बोम्मई कोलू असेही म्हणतात. तिथे हा रंगीबेरंगी बाहुल्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो. देवी देवतांच्या प्रतीकांबरोबरच प्राणी, पक्षी,शेतकरी यांच्याही बाहुल्या असतात. प्रत्येकजण घरात या बाहुल्या व्यवस्थित पणे सजवतो आणि मित्रपरिवारांना घरी आमंत्रित करतो. या बाहुल्यांना गोडाधोडाचा नेवैद्य दाखवला जातो.