विराट कोहली हा भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार आहे. त्याची तुलना सचिन तेंडुलकरसोबत केली जाते. एक चांगला फलंदाज म्हणून त्याचा लौकिक आहे. याच विराट कोहलीचा मेणाचा पुतळा दिल्ली येथील मादाम तुसाँ संग्रहालयात दोनच दिवसांपूर्वी बसवण्यात आला. विराट कोहलीला लिओनेल मेस्सी, कपिल देव आणि उसेन बोल्ट यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळाले. मात्र दोनच दिवसात चाहत्याने या ठिकाणी इतकी गर्दी केली की या पुतळ्याचा उजवा कानच तोडून टाकला. विराटच्या प्रसिद्धीमुळे त्याच्या मेणाच्या पुतळ्याजवळ सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. सेल्फी घेण्याच्या गर्दीत एका चाहत्याने विराटच्या पुतळ्याचा उजवा कानच उपटून काढला.

मादाम तुसाँ संग्रहालयाला भेट देणाऱ्या चाहत्यांना पुतळ्याला हात लावण्याची परवानगी दिलेली असते. तसेच आपण आपल्या आवडत्या सेलिब्रिटी किंवा खेळाडूसोबत प्रत्यक्ष उभे राहून फोटो काढतो आहोत अशी संधी त्यांना या ठिकाणी मिळते. मात्र चाहत्यांची गर्दी एवढी झाली की त्या गडबडीत एका चाहत्याने विराट कोहलीच्या पुतळ्याचा एक कानच ‘नवभारत टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मादाम तुसाँ या संग्रहालयाच्या जगभरात शाखा आहेत. एखाद्या पुतळ्याला चाहत्यांकडून इजा होण्याचा हा पहिलाच प्रकार घडला आहे. विराट कोहलीच्या पुतळ्याचे दोनच दिवसापूर्वी दिल्लीत अनावरण करण्यात आले. मात्र हा पुतळा लोकांना एवढा आवडला की त्याच्याजवळ सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी होऊ लागली. ही गर्दी एवढी वाढली की त्यामुळे एकमेकांना खेचताना एका चाहत्याने गर्दीत या पुतळ्याचा उजवा कानच खेचला.

यानंतर संग्रहालय प्रशासनाच्या टीमने तातडीने या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर विराटचा पुतळा दुरुस्त करण्यासाठी नेण्यात आला. काही वेळाने हा पुतळा होता तिथेच ठेवण्यात आला आहे. यापुढे लोक असे काही नुकसान करणार नाही शांततेने फोटो बाळगतील अशी अपेक्षा संग्रहालय प्रशासनाला आहे.