News Flash

‘ही’ मोबाईल कंपनी आणणार ‘मेक इन इंडिया’ स्मार्टफोन; भारतात करणार ७,५०० कोटींची गुंतवणूक

कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवणार

संग्रहित छायाचित्र

स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोनं भारतातच मोबाईल फोन विकसित करण्यासाठी इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या वाढवून ५० हजार करण्यात येणार आहे. “कंपनीनं भारतात ७ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. याद्वारे कंपनीची मोबाईल उत्पादन क्षमता सध्याच्या ३.३ कोटी युनिट्सवरून १२ कोटी युनिट्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे,” अशी माहिती विवो इंडियाचे संचालक (ब्रँड स्ट्रॅटेजी) निपुण मारया यांनी दिली.

“विवो भारतात इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरची स्थापनाही करणार आहे. त्यानंतर ना केवळ मेक इन इंडियाच उत्पादनांची निर्मिती होईल तर मोबाईलचं डिझाईनदेखील भारतातच तयार केलं जाईल,” अशी माहिती निपुण मारया यांनी दिली. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसनं पीटीआयच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. सध्या हे डिझाईन सेंटर भारतीय ग्राहकांच्या गरजेवर लक्ष देणार आहे. तसंच भारतातच डिझाईन केलेला आणि भारतातच निर्मिती केलेला विवोचा पहिला फोन २०२०-२१ च्या दरम्यानच लाँच होणार आहे. मारया यांनी व्हर्च्युअल कार्यक्रमात ५जी साठी तयार केलेल्या X50 सीरिजचा स्मार्टफोन लाँच करत प्रिमिअम सेगमेंटमध्ये पाऊल टाकलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉरल लोकल या अभियानालाही आपलं समर्थन असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, कंपनीनं आपल्या ग्रेटर नॉयडा येथील प्रकल्पाच्या विस्तारासाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचीही घोषणा केली. भारतीय बाजारपेठेत विवोचा हिस्सा तब्बल २१ टक्के आहे आणि ती दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनीही ठरली आहे.

कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार

“कंपनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे. विस्तारासोबतच कर्मचाऱ्यांची संख्यादेखील ५० हजारांवर नेली जाणार आहे. या गुंतवणुकीनंतर हा प्रकल्प विवोच्या सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे,” असंही मारया म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 1:46 pm

Web Title: vivo smartphone company will invest 7500 crore rupees in india will hire more employees jud 87
Next Stories
1 … तर १० ऑगस्टपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या २० लाखांवर जाईल : राहुल गांधी
2 राजस्थान ऑडिओ क्लिप प्रकरण; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांसह बंडखोर आमदारांविरोधात गुन्हा
3 राजस्थानच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं आहे काय ?
Just Now!
X