News Flash

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात सीबीआयचे झडतीसत्र

मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळ्याच्या तपासांत सीबीआयने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

व्यापम घोटाळा

मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळ्याच्या तपासांत सीबीआयने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. सीबीआयने गुरुवारी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील जवळपास ४० ठिकाणी शोधमोहीम हाती घेतली. मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांचे माजी विशेष अधिकारी धनराज यादव आणि जगदीश सागर यांच्या निवासस्थानांचीही झडती घेतली. सागर आणि यादव हे या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत.
सीबीआयने भोपाळ, इंदूर, जबलपूर, उज्जैन,रेवा, लखनऊ आणि अलाहाबाद येथे शोधमोहीम हाती घेतली होती. मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेत अनियमितता झाल्याबद्दल ही मोहीम हाती घेण्यात आली. एका विशिष्ट प्रकरणासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली नव्हती तर घोटाळ्याची व्याप्ती किती आहे ते उघडकीस आणण्यासाठी मोहीम होती.
धनराज यादव यांच्या लखनऊ येथील घराची, घोटाळ्याचा सूत्रधार जगदीश सागर याच्या घराची, माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा आणि अन्य संशयितांची म्हणजेच भारत मिश्रा, विनोद भंडारी, सुधीर शर्मा, ओमप्रकाश शर्मा, नितीन महिंद्र यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.
सीबीआयच्या पथकाने परीक्षा मंडळाच्या कार्यालयाचीही झडती घेतली. या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने १०५ हून अधिक गुन्हे नोंदविले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या घोटाळ्याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 1:10 am

Web Title: vyapam case cbi red at mp up
टॅग : Cbi
Next Stories
1 हार्दिकच्या अपहरणाच्या दाव्यावर न्यायालय साशंक
2 खासदाराकडून हल्ल्याचा आयएएस अधिकाऱ्याचा आरोप
3 अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मोहीम
Just Now!
X