News Flash

पश्चिम बंगालमध्ये ७८ टक्के मतदान

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ५३ जागांसाठी शनिवारी ७८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले.

| May 1, 2016 01:12 am

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ५३ जागांसाठी शनिवारी ७८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या तुरळक घटनांमध्ये सात जण जखमी झाले. मतदानाचा एक टप्पा अद्याप बाकी आहे. तृणमूल काँग्रेसच्या आमदार आणि उमेदवार या त्यांच्या सतगाछिया मतदारसंघात माकपच्या निवडणूक प्रतिनिधींना मारहाण करण्याचा आदेश कार्यकर्त्यांना देत असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात टिपले गेल्यानंतर त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2016 1:12 am

Web Title: west bengal election 78 percent
Next Stories
1 सोनियांमुळेच ‘ऑगस्टा’ला सवलत
2 ‘नीट’ परीक्षेबाबत कुठल्याही नवीन याचिकेवर विचार नाही
3 इराकमधील कारबॉम्ब स्फोटात २१ जण ठार
Just Now!
X