28 February 2021

News Flash

ममता दीदी, ही तर सुरूवात, निवडणुकीपर्यंत एकट्याच राहाल; अमित शाह यांचा घणाघात

तृणमूल काँग्रेसला मोठं खिंडार

संग्रहीत

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीआधी भाजपाने आपले पाय बळकट करण्यास सुरूवात केली आहे. बंगालमध्ये आज भाजपाचा झंझावात दिसून आला. बंगालच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस व सीएएममधील ११ आमदारांनी व एका माजी खासदाराने भाजपात प्रवेश केला. या महाभरतीनंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला.

केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान भाजपाने तृणमूल काँग्रेसविरोधात एल्गार पुकारला. शाह यांच्या उपस्थितीत तृणमूलमधून बाहेर पडलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्यासह ११ आमदार व एका माजी खासदाराने कमळ हाती घेतले. मिदनापूर येथे झालेल्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले,”आज सर्व पक्षांतील चांगले लोक भाजपात दाखल झाले आहेत. आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपामध्ये आले आहेत. ही तर सुरूवात झाली आहे. निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल. सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमचे चांगले लोक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पक्षात आले आहेत. ममता दीदी म्हणतात, भाजपा लोकांना करायला लावते. दीदींना मी आठवण करून देऊ इच्छितो की, जेव्हा तुम्ही काँग्रेस सोडून तृणमूल पक्ष बनवला, ते पक्षांतर नव्हते का?,” असा सवाल शाह यांनी ममता बॅनर्जी यांना केला.

पुढे बोलताना शाह म्हणाले, “जेव्हा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागतील, तेव्हा २०० पेक्षा अधिक जागा जिंकून भाजपा सत्तेत आलेली असेल.” बंगालच्या जनतेला आवाहन करताना अमित शाह म्हणाले,”तुम्ही तीन दशकं काँग्रेसला दिली. २७ वर्ष कम्युनिस्टांना दिलीत. १० वर्ष ममता दीदींना दिलीत. भारतीय जनता पक्षाला पाच वर्ष द्या. आम्ही बंगालला सोन्यासारखं बनवू,” अशी ग्वाही शाह यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 3:39 pm

Web Title: west bengal politics amit shah kolkata west bengal visit suvendu adhikari tmc bjp midnapore rally updates bmh 90
Next Stories
1 आत्मनिर्भर भारत: DRDO ने विकसित केली जगातील सर्वोत्तम हॉवित्झर तोफ
2 आम्ही अमेरिकेपेक्षाही जास्त कोविड चाचण्या केल्या -अरविंद केजरीवाल
3 “कुठल्याही स्थितीचा सामना करायला आम्ही सज्ज, देशाच्या सन्मानाशी तडजोड नाही”
Just Now!
X