व्हॉट्सअॅप बिटा अपडेटवर यापुढे व्हॉट्सअॅपवर पाठवलेला संदेश तो पाठवल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत डिलिट करता येणार आहे किंवा माघारी घेता येणार आहे.

व्हॉट्सअॅप वेब ०.२.४०७७ या व्हर्जनमध्ये ही नवीन सोय देण्यात आली आहे. रिव्होक नावाची सुविधा यात दिली आहे, त्यातून संदेश काढून टाकता येणार आहे. सेटिंगमध्ये हे उपयोजन नेहमी बंद असेल ते चालू करूनच संदेश माघारी घेता येईल. ते चालू करणे संदेश मागे घेण्यासाठी आवश्यक आहे. व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड बिटा आवृत्तीत व्ही२.१७.१४८ मध्ये अॅट व्ॉब बिटाइन्फो ही सुविधा दिली असून तो नवीन पॉप अप मेनू आहे तो एडिटिंग किंवा फॉर्मेटिंग टेक्स्ट करताना दिसेल. यात बोल्ड, इटालिक, मोनोस्पेस, स्ट्राइकथ्रू या सुविधा असतील. अँड्रॉइड ७ प्लस आवृत्ती गुगल ट्रान्सलेटप्रमाणे ट्रान्सलेट सुविधा आहे. व्हॉट्सअॅपच्या बिटा व्हर्जनवर अनेक नवीन सुविधा दिल्या आहेत. आयओएससाठी नवीन व्हॉट्सअॅप सुविधा देण्यात आल्या आहेत.