भारतीय सीमांच्या सुरक्षेत यूपीए सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीका करीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार कधी जागे होणार, असा सवाल मंगळवारी उपस्थित केला. 
काश्मिरमधील पूंछ भागात नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत घुसखोरी करून पाकिस्तानच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात सोमवारी रात्री पाच जवान शहीद झाले. या विषयावरून मंगळवारी मोदी यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली यूपीए सरकारला लक्ष्य केले. नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांची करण्यात आलेली हत्या अस्वीकारार्ह असल्याचे सांगत मोदी यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शहीद जवानांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे ट्विटरवर सांगितले.