कोविड -१९ विरोधात सुरू असलेल्या मानवतेच्या लढाईत भारत सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिले.

भारताने अमेरिकेच्या मागणीनुसार मलेरियावर उपयुक्त असणारे हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधांचा साठा अमेरिकेला पाठवल्यानंतर ट्रम्प यांना करोनाविरुद्धच्या मानवतेच्या लढाईत भारताने केलेल्या सहकार्याबद्दल भारताचे आभार मानले.

ट्रम्प यांनी केलेल्या आभाराच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. अशा प्रकारची कठीण परिस्थितीच मित्रांना जवळ आणते. भारत आणि अमेरिकेचे मैत्रीपूर्ण संबंध पूर्वीच्या काळाच्या तुलनेत अधिक सौहार्दाचे आणि मजबूत आहेत. कोविड -१९ विरोधात सुरू असलेल्या मानवतेच्या लढाईत भारत सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेल आणि दोन्ही देश मिळून ही लढाई जिंकतील असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला आहे.