News Flash

‘कुठे चूक झाली अल्लाहला विचारेन’; २३ वर्षीय तरुणीची साबरमती नदीत उडी मारुन आत्महत्या; व्हिडीओमुळे खळबळ

आयेशाची साबरमती नदीत उडी मारुन आत्महत्या

अहमदाबादमध्ये २३ वर्षीय तरुणीने साबरमती नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आयेशा असं या तरुणीचं नाव असून आत्महत्येआधी तिने आपल्या फोनवर व्हिडीओ शूट केला होता. भावूक झालेली आयेशा व्हिडीओमध्ये आपण आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असून यासाठी इतर कोणीही जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. आयेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून खळबळ माजली आहे.

आयेशाचा मृतदेह पोलिसांना सापडला असून याप्रकरणी तिच्या पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयेशाचे वडील लियाकत अली यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, “आयेशाचा २०१८ मध्ये राजस्थानमधील आरिफ खानसोबत विवाह झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी हुंडा मागण्यास सुरुवात केली होती. मी त्यांना काही पैसे दिले होते, पण त्यांच्या मागण्या संपत नव्हत्या. काही दिवसांपूर्वी भांडणानंतर आरिफने आयेशाला घरी पाठवलं. त्याने तिच्याशी फोनवरुन बोलणंही बंद केलं होतं. या वेदना सहन होत नसल्यानेच तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला”.

दोन मिनिटांच्या व्हिडीओत तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्य नेटकऱ्यांना भावूक करत आहे. आपली ओळख करुन देताना आयेशा आपल्या मनातील दु:ख बोलून दाखवत आहे. “मी जे काही करण्यासाठी जात आहे त्यासाठी माझ्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही. देवानेच आपल्याला इतकंच आयुष्य दिलं होतं असं समजा,” असं आयेशा सांगताना दिसत आहे.

“पप्पा अजून किती तुम्ही लढा देणार आहात? केस मागे घ्या…आयेशा लढण्यासाठी नाही. मी आरिफवर प्रेम करते…तर मग त्याला त्रास का देईन? जर त्याला स्वातंत्र्य हवं असेल तर मग त्याला मोकळं केलं पाहिजे. असंही माझं आयुष्य इथे संपत आहे. अल्लाहशी माझी भेट होणार याचा आनंद आहे. माझी कुठे चूक झाली अल्लाहला विचारेन. माझ्यामध्ये काय दोष आहे?,” असं आयेशा बोलताना दिसत आहे.

व्हिडीओच्या शेवटी आयेशा म्हणत आहे की, “ही सुंदर नदी…ही मला सामावून घेईल अशी प्रार्थना करते. मी हवेप्रमाणे आहे, मला सतत वाहायचं आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 8:50 am

Web Title: woman films video before ending life in gujarat sgy 87
Next Stories
1 …म्हणून मोदींनी सकाळी सात वाजताच घेतली लस; जाणून घ्या या लसीकरणाचे ‘इलेक्शन कनेक्शन’
2 नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस; देशवासियांना आवाहन करत म्हणाले…
3 निर्बंध पाळून कुंभमेळा
Just Now!
X