News Flash

पोलीस उपनिरीक्षकाने प्रेयसीवर गोळी झाडून रस्त्यात फेकलं

वर्षभरापासून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते...

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

दिल्लीच्या अलीपूर भागात पोलिसाने एका महिलेवर गोळी झाडून तिला रस्त्यात फेकून दिलं. दिल्लीतील एका पोलीस उप निरीक्षकाने महिलेवर गोळी झाडली, तर दुसऱ्या पोलीस उप निरीक्षकाने जखमी महिलेला रुग्णालयात पोहोचवले. आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेची प्रकृती आता स्थिर आहे.

पोलीस उपनिरीक्षक संदीप दाहिया यांनी आपल्यावर गोळी झाडली असे जखमी महिलेने सांगितले. दाहिया हे लाहोर गेट येथील पोलीस ठाण्यात तैनात आहेत. रिपोर्टनुसार, दाहिया यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरु होता. ते पत्नीपासून विभक्त होण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.

जखमी महिला आणि आरोपी दोघेही परस्परांना ओळखतात. वर्षभरापासून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते असे सूत्रांनी सांगितले. संदीप दाहिया यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 11:17 am

Web Title: woman shot by delhi cop dumped on road another cop rescues her dmp 82
Next Stories
1 एन्काउंटरच्या भीतीने ‘मला गोळी मारु नका’ अशी पाटी घालून पोलिसांना शरण आला कुख्यात गुंड
2 कृषी विधेयकावरुन हिंसक आंदोलन: इंडिया गेटवर पेटवला ट्रॅक्टर
3 वाँटेड गुन्हेगाराला मुंबईहून उत्तर प्रदेशला नेताना कार पलटी झाली, गँगस्टरचा जागीच मृत्यू
Just Now!
X